ठाकरेंचा दसरा मेळावा अन् वाहतूक व्यवस्थेत बदल; 'या' वाहनांना नो एन्ट्री (फोटो सौजन्य-X)
Dussehra Traffic Mumbai News in Marathi : नवरात्रोत्सव संपण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर हिंदू धर्मातील महत्त्वांच्या उत्सवांपैकी एक सण म्हणजे दसरा…दसरा सणाला विजयादशमी असेही म्हणतात. याच विजयादशमीनिमित्त राज्यात अनेक पक्षांचा दसरा मेळावा होत असतो. दरम्यान मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यानिमित्ताने मोठी गर्दी होऊ शकते. तर, दुसरीकडे मुंबई वाहतूक पोलिसांकडून दादर-माहीममधील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.
विजयादशमीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा यंदा शिवाजी महाराज पार्कच्या मैदानावर पार पडणार आहे. यासाठी ठाकरे गटाकडून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडणार आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून हा मेळा भव्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर-माहीममधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
दुसरा मेळाव्यामुळे २ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील अनेक मार्गात बदल होणार आहेत. इतर काही मार्गांवरील प्रवेश बंद असणार आहे. दुसरे म्हणजे, मेळ्यासाठी मोठ्या संख्येने गाड्या मुंबईत येण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी हा बदल केला आहे. काही ठिकाणी पार्किंगची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० ते रात्री ११:५५ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू केले जातील.
S.V.S रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक)
पर्यायी मार्ग – सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत. पर्यायी मार्ग – एल. जे. रोड, गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शनवरून पुढे गोखले रोडचा वापर करतील.
दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन दक्षिण वाहिनी.
पर्यायी मार्ग – राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर
पर्यायी मार्ग – एम. बी. राऊत मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.