मेट्रो लाईन ५ ला होतोय विलंब, कारण आले समोर (फोटो सौजन्य - iStock)
ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो लाईन-५ प्रकल्पात ३ वर्षांचा विलंब झाल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. त्यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे माहिती मागितली होती. अनिल गलगली यांना पाठवलेल्या उत्तरातून एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा अभाव उघड झाला आहे. मुंबई मेट्रो लाईन-५ ठाणे-भिवंडी-कल्याणचे काम १ सप्टेंबर २०१९ रोजी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे सोपवण्यात आले.
मुंबई मेट्रो लाईन ५ ही ठाणे ते भिवंडी आणि कल्याण असा २४.९० किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, ज्यामध्ये १५ स्थानके आहेत. हे काम १ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. आता नवीन अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचा वाढता खर्च आणि वेळेवर काम पूर्ण न झाल्यामुळे गलगली यांनी दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई मेट्रो मार्ग-५ प्रकल्प ३ वर्षांनी रखडला
अनिल गलगली यांनी सांगितले की, मुंबई मेट्रो लाईन-५ ठाणे-भिवंडी-कल्याण प्रकल्पाच्या बांधकामाचा अपेक्षित खर्च ८९८.१९ कोटी रुपये आहे. आतापर्यंत खर्चात कोणतीही वाढ झालेली नाही. ३ वर्षांच्या विलंबाचा विचार करता, दंडात्मक कारवाई म्हणून फक्त २०.८८ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
Mumbai Metro : मुंबई मेट्रो मार्गाच्या खर्चात 1274.80 कोटींची वाढ, नेमकं कारण काय?
माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती उघड करण्याचा दावा
मेट्रो ५ हा एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि सध्याचा मेट्रो मार्ग-४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग-१२ (कल्याण ते तळोजा) मध्य रेल्वेला जोडला जाईल. या मेट्रो मार्गामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण भागात राहणाऱ्या व्यावसायिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. अनिल गलगली म्हणाले की, या मेट्रो मार्गामुळे सध्याचा प्रवास वेळ ५० टक्क्यांनी कमी होऊन ७५ टक्क्यांवर येईल. प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे, मेट्रोने प्रवास करणारे लोक त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकर पोहोचू शकतील.
कशी असेल मेट्रो लाईन ५
मुंबई मेट्रो लाईन ५ ही ठाणे ते कल्याण मार्गे भिवंडीपर्यंत धावणारी जलद वाहतूक मेट्रो लाईन आहे. तिला ऑरेंज लाइन असेही म्हणतात. ही लाईन २४.९ किलोमीटर लांबीची असेल आणि त्यात १७ स्थानके असतील.याबाबत अधिक माहिती:
सर्वसामान्यांसाठी मुंबई मेट्रो लाइन-3 सुरु! पहिल्या दिवशी एवढ्या प्रवाशांनी केला प्रवास