अमरावती : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी या कारवाईचे समर्थन करत नवाबचा कबाब झाला असं म्हणत हल्ला चढवला. त्यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याची शंका व्यक्त करत बोडे यांनी त्याला शरद पवारांचा संरक्षण असल्याचे बोलून दाखवले. सत्य असेल तर ते सिद्ध होईल अन्यथा अनिल देशमुख यांच्या बाजूला नवाब मलिक असतील असा घणाघात त्यांनी केला.
[read_also content=”बॉलीवूडचा खलनायक संजूबाबा बनला ‘गुड महाराजा’ https://www.navarashtra.com/movies/bollywoods-villain-sanju-baba-becomes-good-maharaja-nrsm-243521.html”]
महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) आज पहाटेपासूनच चौकशी सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष तीव्र होत असल्याचं दिसतं आहे. या प्रकरणी राष्ट्रावादीकडून संतप्त प्रतिक्रिया येतान दिसत आहे. तर भाजप भरभरून टिका करताना पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याची शंका व्यक्त करत बोडे यांनी त्याला शरद पवारांचा संरक्षण असल्याचे बोलून दाखवले. सत्य असेल तर ते सिद्ध होईल अन्यथा अनिल देशमुख यांच्या बाजूला नवाब मलिक असतील असा घणाघात त्यांनी केला.