कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेकजण अडकल्याची भीती
कल्याण पूर्वमध्ये मंगलराघोनगर परिसरातील मोठी दुर्घटना घडली आहे. एका चार मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यापर्यंत कोसळला असून अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावपथकाला चार ते पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सर्वजण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान दुसऱ्या मजल्यावर एक वृद्ध महिला आणि अडीच वर्षांची चिमुकली अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत २५ कुटुंबं राहात असल्याची माहिती आहे.
लातूरमध्ये दोन भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, पोलिस कर्मचारीही जखमी
सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ अग्निशामन दल आणि पालिकेला याची माहिती दिली. अग्निशामन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले आहेत. दुर्घटना नेमकी का घडली? याबाबत तपास करण्यात येत आहे. घटनास्थळावर पोलीसही दाखल झाले आहेत. सध्या इमारतीत बचावकार्य सुरू आहे. स्लॅबच्या मलब्याखाली कुणी अडकले आहे का? याचा शोध घेण्यात येत आहे.
टोचन करून निघालेल्या ‘कार’ला भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; जखमींचा आकडा आला समोर
कल्याण पूर्व महाराष्ट्र नगर चिकणी पाडा येथे ही इमारत असून ४० वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आज दुपारी इमारतीच्या एका बाजूचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला. या इमारतीमधून चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून गंभीर जखमी असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे . तळमजल्यावरील मलगत आणखी दोन जण अडकल्याची शक्यता वर्तन येते अग्निशमन दलाकडून या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील धोकादायक अति धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.