मुंबईकरांनो रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करा! मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Mega Block News Marathi: मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ आणि गोरेगाव दरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल रद्द असतील तर काही लोकल विलंबाने धावतील. प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक…
स्थानके – ठाणे ते कल्याण
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – स. 10 ते दु. ३.४०
परिणाम – ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावर तर लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावरुन वळवण्यात येतील. परिणामी काही लोकल गाड्या रद्द तर काही लोकल गाड्या उशिराने धावतील.
स्थानके – ठाणे ते वाशी / नेरुळ
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – स. ११.१० ते दु. ४.१०
परिणाम – ब्लॉकमधील ठाणे ते पनवेल/वाशी/नेरुळ दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल गाड्या रद्द राहणार आहेत. पर्यायी हार्बर मार्गावर वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत.
स्टेशन – सांताक्रूझ ते गोरेगाव
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – स. १० ते दु.३
परिणाम – ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही लोकल फेऱ्यांसह हार्बर मार्गावरील काही लोकल फेऱ्याही रद्द राहणार आहे.
अंबरनाथ आणि वांगणी दरम्यानच्या दोन्ही पादचारी पुलांचे गर्डर उंचावण्यासाठी शनिवारी दुपारी १.३० ते रविवारी दुपारी ३.०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक राबविण्यात येत आहे. या ब्लॉकचा वापर बदलापूरच्या कल्याणाकडे जाणाऱ्या १२ मीटर लांबीच्या रुंदी पादचारी पुलाच्या गर्डरसाठी आणि बदलापूर आणि वांगणी दरम्यानच्या ४ मीटर लांबीच्या रुंदी पादचारी पुलाच्या ४ मीटर लांबीच्या रुंदी पादचारी पुलाच्या गर्डरसाठी केला जाणार आहे. ही गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, कोणार्क एक्सप्रेस कर्जत – पनवेल मार्गे जाईल. हे वाहन पनवेल स्टेशनवरून येत आहे.