मुंबईत लवकरच घराचं स्वप्न होणार, म्हाडाच्या 5000 घरांसाठी दिवाळीत लॉटरी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Mhada lottery 2025 in Marathi: मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं असतं. मात्र वाढत्या महागाईमुळे प्रत्येकाल घर खरेदी शक्य होत नाही. मात्र आता मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. येत्या दिवाळीत म्हाडाअंतर्गत नव्या घरांसाठी लॉटरी निघणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हाडाच्या विविध प्रकल्प, भविष्याताली नियोजन आणि बीडीडी पुर्नविकास प्रकल्पाबद्दल संजीव जयस्वाल यांनी माहिती दिली.
मुंबईत ५००० घरांसाठी लॉटरी सुरू आहे. मुंबईत घरे कुठे आहेत, किंवा या घरांची किंमत किती आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एमएचडीचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी माहिती दिली आहे की, बीडीडी चाळ पुनर्विकासातील काही घरांच्या चाव्या वाटपही या महिन्यात केले जाईल.
संजीव जयस्वाल म्हणाले की, मुख्यमंत्री वॉर रुमच्या धर्तीवर आम्ही प्रोजेक्ट मॉनिटरिंग देखील करणार आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे देखील म्हाडा प्रशासन आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करु. म्हाडा कार्यालयात ऑफिस नेव्हिगेटर लावलेले आहेत, ज्याद्वारे कोणतं ऑफीस कुठे आहे? हे लक्षात येईल आणि त्याचा फायदा नागरिकांना होईल.
मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, जीटीबी नगर, पत्राचाळ पुनर्विकास करण्यासाठी असे काही निर्णय घेण्यात आले आहेत. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील काही घरे तयार आहेत. तांत्रिक समस्या आली असती, पण त्या समस्येचा प्रश्न सोडवला गेला आहे. पुढील आठवड्यात ओसी देखील उपलब्ध होईल, लॉटरी देखील काढण्यात आली आहे. १५ तारखेपर्यंत आम्ही किल्ली वाटपाबाबत कार्यक्रम आयोजित करू. नायगाव, एनएम जोशी आणि वरळी बीडीडीची कामेही प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (Mhada) दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या किंवा रिकाम्या इमारतींच्या तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना पात्र घरे देण्याचा एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेऊन, या लोकांना देखील व्यापक यादी योजनेत समाविष्ट केले जाईल. यामध्ये, इमारत कोसळली असेल किंवा रिकामी झाली असेल तरच तळमजल्यावर राहणारे लोक पात्र मानले जातील. म्हाडाचा हा निर्णय तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी दिलासा देणारा ठरेल.
यापूर्वी, सर्वसमावेशक यादीअंतर्गत, तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी घरांचे हक्क मिळण्याची तरतूद नव्हती. यामुळे तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या योग्य घरांपासून वंचित ठेवले जाते, तर बरेच जण अजूनही तात्पुरत्या घरात राहत आहेत. अशा लोकांच्या सोयी लक्षात घेऊन, म्हाडा प्राधिकरणाने एक पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे, आता अशा इमारतींच्या तळमजल्यावर राहणारे लोक देखील मास्टर लिस्टमधील घरांच्या लॉटरीसाठी पात्र ठरतील.
खरंतर मुंबईत काही जुन्या इमारती आहेत. या इमारती १९६९ पूर्वी बांधल्या गेल्या होत्या. म्हाडा या इमारतींकडून कर वसूल करते. या करातून इमारतींची दुरुस्ती केली जाते. इमारती बांधल्याच्या वर्षानुसार विभागल्या आहेत. १९४० पूर्वी बांधलेल्या इमारती पहिल्या श्रेणीत येतात. १९४० ते १९५० दरम्यान बांधलेल्या इमारती दुसऱ्या श्रेणीत येतात. १९५१ ते १९६९ दरम्यान बांधलेल्या इमारती तिसऱ्या श्रेणीत येतात. या इमारतींची अवस्था खूपच वाईट आहे. म्हणून त्यांची पुनर्बांधणी करण्याची योजना आहे.
पावणे दोन वर्षात १३ लॉटरी महाराष्ट्रात काढल्या आहेत. तसेच आम्ही दिवाळी पूर्वी सुमारे ५ हजार घर मुंबई साठी लॉटरीत काढणार आहे. अनेक म्हाडाची घरे पडून आहेत. आज रोजी साडे अकरा ते बारा हजार घरे पडून आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने पॉलिसी काढत आहे. रेंटल मध्ये देण्यात येईल तसाही प्रस्ताव काढलेला आहे . ९० टक्के घर विकली जातील, अशी माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली.