मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! १५ मेपासून १० टक्के कपात; पाणीटंचाईचे संकट ओढवणार
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण आणि बाष्पीभवन होत असल्याने सद्यस्थितीत या धरणांमध्ये केवळ २७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी खबरदारी म्हणून पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
Mumbai: महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवून वापरणे आवश्यक आहे.
त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा.
१५ मे पासून ही कपात लागू होणार असल्याने इमारतींमधील टाक्या भरताना किंवा दैनंदिन वापरावेळी मुंबईकरांना नियोजित कपातीचा सामना करावा लागणार आहे, असे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
३,८५०- दशलक्ष लिटर वाष्णीपुरवठा दररोज सात धरणातून
२३७- दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची गरज.
२७%- सध्याचा पाणी साठा
मुंबईची तहान भागवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि वैतरणा चरणांतील राखीव साठबातून २३७ दशलक्ष लिटर पाणी मिळावे, अशी विनंती केली आहे. या संदर्भात पालिकेने सरकारला अधिकृत पत्र पाठवले असून, हा राखीव साता उपलब्ध झाल्यास मुंबईकरांना पाणीकपातीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये—भटसा, तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मिडल वैतरणा, तुळसी आणि विहार—एकत्रितपणे २८.३५ टक्के पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६ जुलैपर्यंत पुरेसे आहे. भिडे यांनी स्पष्ट केले की, वाढलेले बाष्पीभवन आणि उष्णतेमुळे पाण्याची वाढती मागणी यामुळे परिस्थिती बिकट होत आहे. बीएमसी दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते, तर मागणी ४,३०० दशलक्ष लिटर आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) एल निनो हवामान चक्रामुळे यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा कमी राहील असा अंदाज वर्तवला आहे. या चक्रामुळे पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान असामान्यपणे वाढते, ज्याचा परिणाम भारतातील पावसावर होतो. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पाणी वाचवण्यासाठी बीएमसीने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनपूर्व आढावा बैठकीनंतर अश्विनी भिडे म्हणाल्या की, पाणी कपात न केल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्याची पातळी संपू शकते.






