३३७ गावांना पुराचा धोका : प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
नांदेड : मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूम पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले, नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास ३३७ गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या-त्या भागातून सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने जिल्हा प्रशासनाला हाताळता याव्यात यादृष्टिने सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
चिंताजनक!’कोलाम’ मध्ये यॅलेसेमियाचे प्रमाण 15 टक्के, आदिवासीबहूल भाग विळख्यात
मान्सून २०२५ च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कुन्डे यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, आरोग्य, तहसीलदार, मृद व जलसंधारण पशुसंवर्धनचे अधिकारी होते.
नागपूरमध्ये भीषण अपघात: आईसोबत ऑटोतून उतरताना ७ वर्षीय मुलाला ट्रकने चिरडलं, दुर्दैवी मृत्यू
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, जिल्ह्यात ३३७ गावे पूरग्रस्त आहेत. या गावात रंगीत तालीम घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची खरेदी करावी. २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन कक्षातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करावेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहतील यांचे नियोजन करावे.