मुंबई: एक ना एक दिवस उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितलं आहे. खासदार झाल्यानंतर राज्यसभेत शेजारी बसणारे संजय राऊत (Sanjay Raut) उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबाबत काय बोलायचे, हे त्यांना या भेटीत सांगणार असल्याचं राणे म्हणाले. ते ऐकून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) हे संजय राऊतांना चपलेनी मारल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राणेंनी केलाय. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचं काम केलं, अशी टीकाही राणेंनी यावेळी केली. आपल्याला १९९० सालापासून संरक्षण देण्यात आलंय, आपण ते मागितलेलं नाही, असंही राणे म्हणाले. सध्याच्या राजकारणात संजय राऊत हे जोकर असल्याची बोचरी टीकाही राणेंनी केलीय.
[read_also content=”प्राजक्ता माळी घेऊन आलीये ‘प्राजक्तराज’, मिळणार अस्सल मराठमोळे अलंकार https://www.navarashtra.com/latest-news/old-maharashtraian-style-ornaments-launch-by-prajatka-mali-on-prajaktaraj-nrps-359831.html”]
कुणाला चॅलेंज देतोस-राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातला संघर्ष चांगलाच तापलाय. राऊतांना पुन्हा जेलवारी घडेल, या नारायण राणेंच्या टीकेनंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. संरक्षणात फिरता, हिंमत असेल तर संरक्षण सोडून या असं आव्हान राणेंना दिलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणतील तिथं यायला तयार आहे, असं प्रतिआव्हान राणेंनी दिलंय. शिवसेनेच्या पहिल्या १९ जून १९६६ सालापासूनच्या ३९ वर्षांत शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तर शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतलीय. आाता शिवसेनेचे ५६ पैकी १२ ही आमदार उरलेले नाहीत. याचा आनंद संजय राऊतांना होतोय. असंही राणे म्हणाले.
संजय राऊत ही विकृती- राणे
संजय राऊत ही विकृती आहे, ती दाखवण्याचं काम माध्यमं करतायेत असं राणे म्हणाले. संपादक म्हणून आणि राजकीय नेते म्हणून राऊतांनी कोणतं बौद्धिक, विकासात्मक, विधायक काय काम, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे जनतेच्या हिताचं काय बोलतात, असा सवालही त्यांनी केलाय. अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात काय भरीव कार्य केलं असा प्रश्नही त्यांनी यानिमित्तानं उपस्थित केलाय. आता यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.