Nashik News: साधूग्राममध्ये वृक्षतोडीच्या विरोधामुळे प्रशासन दोन पावले मागे
प्रशासनाकडून दाखल हरकतींची सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थितांच्या भाडीमारामुळे ही सुनावणीही कायदेशीररित्या पुर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे उद्यान अधिक्षकांची या संदर्भातील अंतीम निर्णयाचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात ढकलला आहे. अशा परिस्थतीत या प्रश्नांचे राजकारण होण्याची शक्यता अधिक असल्याने ते टाळण्यासाठी अधिकाधिक झाडे कशी वाचवू शकतील त्यादृष्टीने साधुग्रामच्या नियोजीत ले-आऊट मध्येच बदल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. विशेष करून दाट झाडांच्या ठिकाणी दुचाकी पार्किंग वा तत्सम सुविधा उभ्या करून झाडांना इजा न पोहोचविण्याचा तसेच मोकळ्या व पडीक जमीनीवर तंबू उभारून ते आखाडे, खालशांना वापरण्यासाठी देण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला जात आहे. त्यातील एक ले-आऊट बदलण्यातही आला आहे.
स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या
दरम्यान, तपोवनातील झाडांवर लाल रंगाच्या मारलेल्या फुल्या म्हणजे वृक्षतोड नव्हे तर झाडांची मोजणी करताना झाड मोजले गेल्याची ती खूण असल्याचा निर्वाळा उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांनी दिला. अजून या प्रश्नी बरीच कायदेशीर प्रक्रीया केली जाणार आहे. (Nashik Tapovan Tree Cutting Issue)
फक्त झाडांच्या संख्येची मोजणी झाली. या ठिकाणी काय कामे केली जाणार, त्यामुळे किती झाडे बाधित होणार, त्यातील किती वाचविता येवून कामे करता येतील याचा अभ्यास करणे बाकी असून, सध्या तपोवनात या दृष्टीने दुसरे सव्र्व्हेक्षण केले जात आहे. त्यात महत्वाच्या झाडांना संरक्षण व तोडण्यायोग्य झाडांची संख्या निश्चित केली जाईल, तसा प्रस्ताव तयार करून तो अतिरीक्त आयुक्तांमार्फत आयुक्तांकडे व आयुक्तांकडून तो वृक्ष प्राधिकरण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचेही भदाणे यांनी सांगितले. जो पर्यंत सर्व्हेक्षण व बाधित होणाऱ्या झाडांची संख्या स्पष्ट होत नाही तो पर्यंत हरकतीची सुनावणी पुर्ण होणार नाही. असेही ते म्हणाले.






