पुणे : कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही. असं वक्तव्य काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल केले होते.
दरम्यान त्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पुण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे, वनराज आंदेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[read_also content=”शिवसेना अखंड राहावी यासाठी शिवसैनिकाचा सोलापूर ते मुंबई पायी प्रवास https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sainiks-journey-on-foot-from-solapur-to-mumbai-to-keep-shiv-sena-intact-nrdm-309880.html”]
रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, गुजरात, राजस्थानची लोक महाराष्ट्रातून निघून गेली तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही. हे म्हणून महाराष्ट्राचा त्यांनी पुन्हा एकदा अपमान करून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावल्या व भडकवलेल्या आहेत या वक्तव्याचा आज आम्ही निषेध करत आहोत. येणाऱ्या पुढील काळात जर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीमहाराष्ट्राची माफी मागितली नाही तर आम्ही येथील पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. मुंबई ही फक्त महाराष्ट्राचे आहे बाकी कोणाच्या बापाची नाही. राज्यपालन सारखी बाहेरची माणसे येऊन महाराष्ट्रात बडबड करतात. हे राष्ट्रवादी कदापि सहन करणार नाही. भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पद सोडून महाराष्ट्राच्या बाहेर जावे, आम्ही मागणी आज या आंदोलनातून करत आहोत. असे रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.