फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE 12th Board Exam Result 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) १२ वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा देशभरातील लाखो विद्यार्थी करत आहेत. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स अशा विविध शाखेच्या विद्यार्थ्य़ांचे लक्ष या निकालाकडे लागले असून मे महिन्याच्या तिसऱ्या अठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस ही केवळ तारीख नसून त्यांच्या भविष्याला दिशा देणारा महत्त्वाचा क्षण आहे.
निकाल जसजसा जवळ येत आहे, तसतसे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहे. ‘किती टक्के मार्क मिळतील?’ ‘अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का?’ असे अनेक प्रश्न तणाव निर्माण करतात. मात्र आशा वेळी घाबरून न जाता संयम राखणे गरजेचे आहे.
या वर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ या संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की परिक्षेतील मार्क विद्यार्थ्याचे भविष्य ठरवू शकत नाहीत. ते असे म्हणाले की, टॉपर विद्यार्थ्यांची नावे काही वर्षांनी कोणाच्याही लक्षात राहत नाहीत. गुणांपेक्षा अधिक महत्त्व कौशल्याला आहे, त्यामुळे स्कीलवर काम करणे गरजेचे आहे.
टॉप येण्याच्या नादात स्वत:चा वर्तमान खराब करू नका. जरी गुण कमी मिळाले तरी हाताश न होता पुढच्या टप्प्यावर अधिक मेहनत करून यशाचे शिखर गाठावे पण प्रवासात अडखळलात तरी स्वत:वर विश्वास ठेवून पुन्हा प्रयत्न करणे हाच यशाचा खरा मंत्र आहे.






