Raigad Gram panchayat News: मुरूड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींकरिता पोटनिवडणुक निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर तालुक्यातील वेळास्ते, एकदरा, मांडला व काशिद या ठिकाणी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. त्यापैकी वेळास्ते ग्रामपंचायत सर्वसाधारण स्त्री सदस्य पदाकरीता सेजल शैलेश काते व एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक २ अनुसुचीत जमाती सदानंद भिकु वाघरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या दोन ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाल्या. तर ३ ग्रामपंचायत पोटनिवडणुका शांततेत निवडणूक पार पडल्या.
Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिसांमध्ये मोठा फेरबदल; २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
प्रथम एकदरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतपेट्या उघडण्यात आल्या. एकदरा ग्रामपंचायत पदाकरीता प्रभाग क्रमांक १ मधून अनुसुचीत जमाती सदस्य पदाकरीता ४६३ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत सदानंद भिकु वाघरे २५० मते, धर्मा नांग्या लोदी २०९ मते, तर नोटा ४ मते मिळाली. यामधून सदानंद भिकु वाघरे हे प्रभाग क्रमांक १ मधून अनुसुचीत जमाती सदस्य पदाकरीता निवडुन आल्याचे घोषित केले.
प्रभाग क्रमांक २ मधुन अनुसूचीत जमाती स्त्री सदस्य पदाकरीता ५०३ मतदारांनी मतदान केले होते. यामधुन अनुसूचीत जमाती स्त्री सदस्य पदाकरीता पुनम परशुराम गंबास निवडुन आले आहेत. एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ अनुसूचीत जमाती सदस्य पदांकरीता २६४ मतदारांनी मतदान केले होते. शेखर नारायण वाघरे हे निवडून आले आहेत. एकदरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ अनु जमाती स्त्री पदाकरीता ५२८ मतदारांनी मतदान केले होते. पुनम परशुराम गंबास हे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. मांडला ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ सदस्य पदाकरीता करिता ३१३ मतदारांनी मतदान केले होते. नोटाला १ मते मिळाली असुन यामधुन मांडला ग्रामपंचायत सदस्य राजेश एकनाथ पाटील हे निवडून आले.
अखेर ठरलं ! महाराष्ट्र दिनापासून मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ होणार खुला; प्रवास होणार अधिक गतिमान
काशिद ग्रामपंचायत पोटनिवडणुक प्रभाग क्रमांक ३ मधुन ना. मा.प. पदाकरीता ३८८ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत राकेश गणेश कासार २७४ मते, सुयोग सुर्यकांत जंगम ११४ मते, राकेश गणेश कासार हे निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून सर्वसाधारण पदाकरीता ३८८ मतदारांनी मतदान केले होते. या मतमोजणीत अतिश चंद्रकांत कासार २४५ मते, हेमंत राजेंद्र चाळके १४३ मते मिळाली. यामधुन काशिद ग्रामपंचायत सदस्य पदाकरीता अतिश चंद्रकांत कासार है निवडून आले आहेत. काशीद ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व धुरा सरपंच संतोष राणे यांनी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. त्यांना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे यांनी उत्तम सहकार्य केले आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.






