गोंदिया : गोंदियात(Gondia ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बॅनरवरून एकटे अमित शाहच (Amit Shah) नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच (Full BJP with lotus) गायब करण्यात आले आहे.
या पोस्टरमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर फडणवीस यांचे खंदे समर्थक विधान परीषद सदस्य भंडारा – गोंदियाचे (Legislative Council Member Bhandara – Gondia) माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके (Former Guardian Minister Dr. Parinee Phuke) यांनी गोंदिया शहरातच नव्हे तर राज्याची राजधानी मुंबईपासून उपराजधानीतही जागो – जागी लावले आहेत.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार नाही अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. ही नाराजी पुन्हा एकदा या होर्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लागल्यानंतर राज्यात काही ठिकाणी भाजपच्या पोस्टरवर अमित शाह यांचा फोटो दिसला नाही. अमित शाह यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी शाह यांचा फोटो पोस्टरवर लावला नसल्याचं बोलले जाऊ लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. भाजपच्या प्रोटोकॉलमुळे अमित शाह यांचा फोटो लावला नसल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली.