मशागतीसाठी आता यांत्रिक साधनांचा वापर! शेतकऱ्यांची ट्रॅक्टरला पसंती; पारंपारिक बैलजोडी होतेय कालबाह्य
शेतकऱ्यांचा जीवलग मित्र म्हणून बैल ओळखला जातो. या बैलजोडीच्या भरोशावर शेतकरी शेतीची विविध कामे करीत आला होता. धान पेरणीपासून तर घरात उत्पादनाची साठवणूक करण्यापर्यंत कित्येक काळापासून शेतकरी प्रत्येक कामासाठी बैलबंडीच्या आधार घेत आला. मात्र अलिकडील शेतातील यांत्रिकीकरणामुळे बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे जीवाभावाचा सर्जाराजा ट्रॅक्टरपुढे उपेक्षित राहिला आहे. शेतीच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून शेतीचे पारंपारिक अवजारे मागे पडून नवनवीन यांत्रिक उपकरणे, मशिनरीज येऊ लागली आहेत.(फोटो सौजन्य – AI)
कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना
श्रीमंत शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही ती स्वीकारणे सुरू केले. त्यामुळे शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणावर भर दिल्या जात आहे. पूर्वी पेरणीपूर्व मशागत करून जमीन भुसभूसीत करून वखरणी, चिखलणी, मालाची वाहतूक, साठवणूक करण्यापर्यंत बैलजोडीचा उपयोग केला जात असे, मात्र या बैलजोडीअभावी शेतकऱ्यांचा कल आता शेती कामात ट्रॅक्टरकडे वाढल्याने शेतकऱ्यांचा हा जिवलग मित्र कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
रासायनिक खतामुळे जमिनीची पोत घसरली पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे मुबलक पाळीव जनावरे असायची. या जनावरांच्या विष्ठेचा शेणखत म्हणून शेतात वापर केला जायचा. मात्र आता पाळीव जनावरे कमी झाल्याने शेतकरी बांधव शेणखताऐवजी रासायनिक खताचा अवलंब करू लागला आहे.आजघडीला ग्रामीण भागातील काही मोजक्याच सामान्य शेतकऱ्यांकडे बैलजोडी उरली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे नाहीच्याच बरोबरीत पाळीण जनावरे असून अनेक जनावरे तर कत्तलखाण्यासाठी विक्री काढण्याकडे शेतकरी वळताना दिसून येत आहे. शेतात आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्यामुळे येणाऱ्या काळात बैलजोडी नामशेष होण्याचे चित्र दिसू लागले आहे.
Amravati News: ‘जीपीएस’ प्रयोगावर प्रश्नचिन्ह! धान वाहतुकीसाठी इंटरनेट सुविधेअभावी अडथळे
शेतकरी पूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने शेत मशागत करीत असल्याने शेत जमीन भूसभूसीत होऊन धान उत्पादनात वाढ होत होती. मात्र अलीकडे ट्रॅक्टरने मशागतीचे काम होत असल्याने जमीन भुसभुशीत होण्याऐवजी अधिकच घट्ट होत आहे. परिणामी पिकाचे मुळे पाहिजे त्या प्रमाणात खोलवर जात नसल्यामुळे पिकांची वाढ जलद गती न होता उत्पादनातही कमालीची घट दिसून येत आहे.






