File Photo : Maharashtra Assembly
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली आहे. सत्तेतील पक्षांना जर वाटत असेल की, आता निवडणूक घेतली तर आपला पराभव निश्चित आहे, तर एकच मार्ग असतो. तो म्हणजे राष्ट्रपती राजवट लावणे, असे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : भाजपच्याच कार्यकर्त्याने दाखल केली भाजप खासदाराविरोधात पोलिसांत तक्रार; त्याचं कारण…
पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महायुती सरकारबाबत जी 10 वर्षांची अँटी इन्कबन्सी आहे. ती त्यांना कमी करायची आहे. राष्ट्रपती राजवट लावून काहीतरी करुन काहीतरी चांगलं होईल, याबाबत आशावादी राहायचे, असा विचार सत्ताधारी करु शकतात. राष्ट्रपती राजवट लागू केली तर आपल्याला सरकार टिकवता येईल. फक्त राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पॉलिटिकल असेल’.
निवडणूक घेणार नसाल तर आरक्षणाचा काय उपयोग?
हरयाणाची निवडणूक 8 ऑक्टोबरला संपुष्टात येईल. अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. आज आपण पाहतोय, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्ष झाले निवडणुका झालेल्या नाहीत. संविधानातून आपण पॉलिटिकल आरक्षण दिले. निवडणूक घेणार नसाल तर आरक्षणाचा काय उपयोग आहे? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.
हरियाणा, महाराष्ट्राची निवडणूक एकत्र होणे गरजचेचे
चव्हाण पुढे म्हणाले, 2009 मध्ये मतदारसंघांची पुर्नरचना झाली, तेव्हापासून आत्तापर्यंत तीन निवडणुका झालेल्या आहेत. त्या हरयाणा आणि महाराष्ट्राच्या एकत्र झालेल्या आहेत. त्या एकत्र होणे स्वाभाविक आहे. पण यावेळी विशेष परिस्थिती किंवा थातूरमातूर कारण सांगून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : ‘येऊ नको म्हटलं तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था’; अजित पवारांना पुन्हा डिवचलं