मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- यूट्यूब)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समितीची स्थापना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केला अर्थसंकल्प
शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी
Cm Devendra Fadnavis On Farmers: आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली आहे.
कर्जमाफीची घोषणा काय?
अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच ३० सप्टेंबर 2025 पर्यन्त पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. यामुळे ज्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज थकीत आहे त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे.
जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार, कर्जमाफीसाथी दीर्घकालीन योजना केल्या जाणार आहेत.






