• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pratap Sarnaik On Cluster Development Plan To Be Implemented In Vasai Virar

वसई विरारमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होणार, प्रताप सरनाईक यांचा निर्णय

रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली यातील मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2025 | 05:57 PM
वसई विरारमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होणार, प्रताप सरनाईक यांचा निर्णय

वसई विरारमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होणार, प्रताप सरनाईक यांचा निर्णय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Vasai Virar : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री व पालघर जिल्हा संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज या दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात आम्ही सर्वजण , राज्य सरकार नागरिकांच्या सोबत उभे आहोत. शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विरारच्या या दुर्घटनेत ज्यांची घरे गेली आहेत त्यांच्या तात्पुरती राहण्याची सोय बोलींज म्हाडा प्रकल्प येथील घरांमध्ये करण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षाना सूचना केल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सरनाईक यांनी फोनवरून सविस्तर चर्चा केली. बोलींज म्हाडा प्रकल्पातील ६० घरे लगेच दुर्घटनाग्रस्त नागरिकाना तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी देण्याचा निर्णय सरनाईक यांनी घेतला.

गणरायाला निरोप, पण पालिका क्षेत्रातील निर्माल्य संकलन करून पुढे काय केलं जातं?

या रहिवाशांना उद्यापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी म्हाडाची घरे दिली जातील , असे सरनाईक यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी महापालिका मुख्यालयात याबाबत बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वसई विरारमधील धोकादायक , जुन्या इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणि SRA लागू केला जाईल , असेही उपमुख्य मंत्री शिंदे यांनी व मंत्री सरनाईक यांनी सांगितले. याबाबत पुढील आठवड्यात मंत्रालयात एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत , अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम दुर्घटनेतील जखमींची हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्यावरील उपचारा बाबत महापालिकेला सूचना केल्या . त्यानंतर दुर्घटना स्थळाला भेट दिली. महापालिका मुख्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा बैठक घेऊन भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून काय काय उपाययोजना करता येईल त्याचा आढावा घेतला.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की , वसई विरार महापालिकेचा स्वतःचे एकही संक्रमण शिबिर नाहीये. अशी एखादी दुर्घटना घडली तर विस्थापित नागरिकांना राहण्यासाठी महापालिकेने घरांची व्यवस्था करण्यासाठी गृह प्रकल्प तयार करावा. म्हाडा सोबत जॉइंट वेंचर करून महापालिकेने आधी स्वतःची घरे उपलब्ध करून घ्यावीत. वसई विरार नालासोपारा मध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक अनधिकृत इमारती आहेत. या इमारतींसाठी क्लस्टर योजना व एसआरए योजना लागू करावी , याबाबत महापालिकेने प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवावा , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लवकरच घेतली जाईल , असे सरनाईक यांनी सांगितले.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिकेतून फोन लाऊन सर्व माहिती दिली. वसई विरारच्या प्रश्नावर लवकरच मी बैठक घेतो आणि तेथे क्लस्टर डेव्हलपमेंट , एसआरए प्रत्यक्षात लागू करून लोकाना न्याय दिला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यापुढे अनधिकृत बांधकामाची एकही वीट नको!

आजवर अनधिकृत बांधकामे करून बिल्डरांनी लोकांची फसवणूक केली. यापुढे वसई विरार मध्ये एकही अनधिकृत बांधकामाची भिंत उभी राहता कामा नये. अनधिकृत बांधकामे आणि दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्या. शहरात यापुढे अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन यांनी कठोर भूमिका घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महापालिका प्रशासनाने तातडीने मदतकार्य करावे आणि जखमींवर योग्य उपचार होतील याची काळजी घ्यावी, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित व स्थानिक आमदार राजन नाईक यांनी दुर्घटना घडलेल्या इमारतीमधील २८ कुटुंबांना प्रत्येकी २०/२० हजार तातडीची मदत वैयक्तिक रित्या केली आहे. यावेळी आमदार राजेंद्र गावित , खासदार हेमंत सवरा , आमदार राजन नाईक , पालघर जिल्हाधिकारी , वसई विरार मनपा आयुक्त यांच्यासह सर्व अधिकारी देखील उपस्थित होते.

Uddhav Thackeray News: ‘मी आज देवेंद्र फडणवीसांना फोन करणार’; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Web Title: Pratap sarnaik on cluster development plan to be implemented in vasai virar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • palghar
  • virar

संबंधित बातम्या

PALGHAR : डहाणूत BJP विरुद्ध शिवसेना आमनेसामने ! जिंकणार कोण?
1

PALGHAR : डहाणूत BJP विरुद्ध शिवसेना आमनेसामने ! जिंकणार कोण?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सूर्य कधी संपत नसतो! महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत पेटवणारे भाषण

सूर्य कधी संपत नसतो! महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत पेटवणारे भाषण

Dec 06, 2025 | 04:15 AM
Crime News: धारदार शस्त्राच्या धाकाने दुचाकीस्वार महिलेला लुटले; ३ लाख ७० हजारांचे दागिने लंपास

Crime News: धारदार शस्त्राच्या धाकाने दुचाकीस्वार महिलेला लुटले; ३ लाख ७० हजारांचे दागिने लंपास

Dec 06, 2025 | 02:35 AM
रुपयाला कोणी तरी आडवा! डॉलरच्या तुलनेत लागलाय जोरदार कोसळू

रुपयाला कोणी तरी आडवा! डॉलरच्या तुलनेत लागलाय जोरदार कोसळू

Dec 06, 2025 | 01:15 AM
मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, ‘या’ 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी

मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, ‘या’ 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी

Dec 06, 2025 | 12:30 AM
‘जान ही ले ले’ दीपिकाला पाहून सोशल मीडियावर नवरा रणवीर फिदा, सौंदर्याने पुन्हा केले घायाळ

‘जान ही ले ले’ दीपिकाला पाहून सोशल मीडियावर नवरा रणवीर फिदा, सौंदर्याने पुन्हा केले घायाळ

Dec 05, 2025 | 11:47 PM
फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर, 50 मराठी चित्रपटांना मिळणार 14 कोटी 62 लाखांचे अर्थसहाय्य

फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर, 50 मराठी चित्रपटांना मिळणार 14 कोटी 62 लाखांचे अर्थसहाय्य

Dec 05, 2025 | 11:24 PM
Skin Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेने हैराण? ‘हे’ घरगुती उपाय त्वचा नेहमी ठेवतील मऊ-मुलायम

Skin Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेने हैराण? ‘हे’ घरगुती उपाय त्वचा नेहमी ठेवतील मऊ-मुलायम

Dec 05, 2025 | 11:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM
वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

Dec 05, 2025 | 08:11 PM
Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Dec 05, 2025 | 07:58 PM
Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Dec 05, 2025 | 07:46 PM
Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Dec 05, 2025 | 07:38 PM
KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

Dec 05, 2025 | 07:28 PM
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.