डॉ. बबनराव तायवाडे : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजाने केंद्राकडे आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकण्याची मागणी लावून धरावी. त्यासाठी ओबीसी समाज मराठा समाजासोबत राहिल, असा सल्ला दिला होता. मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मात्र तायवाडे यांचा हा सल्ला धुडकावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा घातली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणावर पुन्हा राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रीय ओबीसी संघाला राज्य सरकारने लिखित आश्वासन ही दिल आहे. ओबीसी महासंघ आपल्या भूमिकेत ठाम आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे बोले की, आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र ने राज्य सरकारला दिला आणि राज्यातील मागासवर्गीय यांना राज्याने १० किंवा १२ टक्के दिला. त्यावर कोणाला पण आक्षेप राहणार नाही. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली ला गेले होते. ते आरक्षणासाठी गेले असेल, तर त्यांनी अशी केंद्र सरकारला मागणी करावी की, राज्यसभा आणि लोकसभेत विधेयक आणून ५० टक्केची अट मध्ये बदल करावा. परंतु मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं तर महाराष्ट्रातील ६० टक्के ओबीसी रस्त्यावर उतरतील.