पुणे जनगणना २०२६: १६ मे पासून प्रगणक तुमच्या दारी; प्रशासनाने आखली १०,१७२ परिमंडळे
Pune Rural Population Growth : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येत गेल्या १५ वर्षांत अभूतपूर्व वाढ झाली आहे. आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीनुसार, ग्रामीण भागाची लोकसंख्या आता ८० लाखांच्या वर पोहोचल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. २०११ च्या जनगणनेत हा आकडा ४५ लाख होता, याचा अर्थ लोकसंख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. ही आकडेवारी प्राथमिक असून, प्रत्यक्ष जनगणनेनंतर अधिकृत अंतिम आकडेवारी समोर येईल. प्रशासनाने नागरिकांना प्रगणकांना योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासनाने आशासेविका आणि तलाठ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही परिमंडळे निश्चित केली आहेत. १६ मे पासून प्रगणक (Enu-merators) प्रत्येक घरात जाऊन माहिती गोळा करतील. छोट्या वाड्या-वस्त्यांवर ८०० पेक्षा कमी लोकसंख्या असली, तरी तिथे स्वतंत्र परिमंडळ तयार करण्यात आले आहे जेणेकरून प्रत्येक नागरिकाची नोंद होईल.
LPG सिलेंडर कनेक्शनबाबत सरकार मोठा निर्णय घेणार; तुमच्याकडेही PNG, LPG दोन्ही आहे तर आता…
– लोकसंख्या वाढ २०११ (४५ लाख) ते २०२६ (अंदाज ८० लाख).
– गणनेचा आधार जिल्हा प्रशासनाने तयार केलेली १०,१७२ परिमंडळे (एका परिमंडळात साधारण ८०० नागरिक).
– महत्वाची तारीखः १६ मे ते १५ जून दरम्यान ‘घरगट यादी’ तयार करण्याचे काम प्रत्यक्ष सुरू होईल.
– वाढीचे कारणः झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि शहरीकरण.
आंबेगाव तालुक्यातील जनगणना-२०२७ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. १ मे पासून जनगणना सुरु होणार असून तालुक्यात दोन टप्प्यात एकूण १४६ गावांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली. तहसील कार्यालय, घोडेगाव यांच्या मार्फत जनगणनेच्या कामासाठी एकूण ४३४ प्रगणक व ७५ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मंचर नगरपंचायतीकडून ६१ प्रगणक व ११ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनगणनेचे काम प्रभावीपणे पार पाडले जाणार आहे. सदर प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ८ फील्ड ट्रेनर नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यांत एकूण १२ बॅचेसचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.
Pratap Sarnaik: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची इंद्रपूर बस स्थानकाला अचानक भेट
हे प्रशिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे सुरू करण्यात आले आहे. जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना करण्यात येणार असून घराचा प्रकार, पिण्याचे पाणी, शौचालय, वीज सुविधा तसेच कुटुंबाची मूलभूत माहिती संकलित केली जाणार आहे. या टप्प्यात १ ते १५ दरम्यान नागरिकांना स्वगणना पद्धतीने स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी se.census.gov.in संकेतस्थळावर जाऊन माहिती भरण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत या प्रगणक घरोघरी भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






