Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा... मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस
Free Fire MAX: प्लेअर्सचं अकाऊंट का बॅन होतं? या चुका टाळा, नाहीतर गेम होईल लॉक
6 मे रोजी भारतात विवो कंपनी X300 सीरीज लाँच करणार आहे. या फ्लॅगशिप विवो एक्स 300 अल्ट्रामध्ये 6.82 इंच 2K एलटीपीओ पॅनल मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाणार आहे. कंपनीचे आगामी डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरीसह 100W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये 200MP चा प्राइमरी सेंसर आणि 200MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
7 मे रोजी कंपनी Vivo X300 FE हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे मॉडेल कॉम्पॅक्ट ऑप्शन म्हणून सादर केले जाणार आहे. कंपनीच्या आगामी फोनमध्ये 6.31 इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट असणार आहे. यामध्ये 6,500mAh बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. यामधील प्रायमरी कॅमेरा 50MP चा असणार आहे. हे दोन्ही डिव्हाई, नॉयर ब्लॅक, लिलाक पर्पल आणि अर्बन ऑलिव्ह या रंगांमध्ये सादर केली जातील.
मे महिन्याच्या अखेरीस कंपनी स्मार्टफोन सिरीजमधील दोन मॉडेल्स लाँच करणार आहे. ज्यामध्ये Find X9 Ultra आणि Find X9s यांचा समावेश असणार आहे. या डिव्हाईसमध्ये चार कॅमेऱ्यांचा सेटअप असणार आहे. अल्ट्रा मॉडलमध्ये दोन 200MP कॅमेरा आणि दोन 50MP कॅमेरा दिले जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये 7,050mAh बॅटरी आणि 6.82-इंच एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमधील स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी कंपनी Oppo Find X9s लाँच करणार आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s प्रोसेसर दिला जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. कंपनीचे हे डिव्हाईस 7,025mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप असू शकतो.
AirPods Hidden Use: फक्त गाणीच नाही! अॅपल एअरपॉड्स करू शकतात ही कामं, वाचूम तुम्हीही व्हाल हैराण
वनप्लस देखील मे महिन्यात दोन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. हे डिव्हाईस Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite या नावाने सादर केले जाणार आहेत. स्टँडर्ड Nord CE 6 मध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 6 एसओसी आणि 8,000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. तर Nord CE 6 Lite मध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 अपेक्स चिपसेट आणि 7,000mAh बॅटरी दिली जाणार आहे. दोन्ही फोनमध्ये 144Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा असणार आहे.






