वडगाव मावळमधील 24 शाळा या पुणे मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : पुण्यातील शाळांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील 24 शाळा लवकरच आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज ‘पुणे मॉडेल स्कूल’ (आदर्श शाळा) म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 20 कोटी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.
या 24 शाळांमध्ये अत्यानुधिक सुविधा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यामध्ये नवीन वर्गखोल्या, प्रवेशद्वार, व्यासपीठ, पदपथ, हॅंडवॉश स्टेशन, शौचालये आणि संरक्षक भिंती अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामुळे वडगाव मावळमधील 24 शाळा या सुसज्य आणि सुविद्य होणार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावळ तालुक्यातील आदर्श शाळांची यादी व निधी
१) आढले बु : ९१.२१ कोटी
२) शिवणे : १०९.२२ कोटी
३) उर्से : ७७.०५ कोटी
४) ताजे : ४८.९० कोटी
५) भोयरे : १५९.५९ कोटी
६) तुंग : ५६.७१ कोटी
७) सांगवडे : ९१.५० कोटी
८) गोवित्री : ४९.३३ कोटी
९) वराळे : १००.०४ कोटी
१०) येलघोल : १९७.६१ कोटी
११) महागाव : १०.७७ कोटी
१२) नाणे : ८६.५० कोटी
१३) साते : ५५.४४ कोटी
१४) नायगाव : ५९.६६ कोटी
१५) खांडी : ८३.१७ कोटी
१६) कुसगाव : ७७.४४ कोटी
१७) माळेगाव खु. : ७९.८९ कोटी
१८) नवलाख उंबरे : ६६.१८ कोटी
१९) बुधवडी : १२२.२३ कोटी
२०) इंदोरी – १५०.२३ कोटी
२१) टाकवे : १४४.४० कोटी
२२) कुसवली : ८५.५६ कोटी
२३) वारु : ४०.४१ कोटी
२४) शिलाटणे : १६७.०० कोटी
या ऐतिहासिक शालेय विकास प्रकल्पामुळे मावळ तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात मोठी गुणवत्ता वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शिक्षण मिळण्यासाठी ही पायाभूत कामे अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. त्यामुळे अनेकांची पाऊले ही सरकारी शाळांकडे वळण्याची शक्यता आहे. या २४ शाळांच्या कामांसाठी आवश्यक निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली सर्व कामे नियमानुसार वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकल्पाबाबत माहिती देताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “ही केवळ शाळांची डागडुजी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साकारलेला एक शासकीय व सामाजिक संकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार! ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवणार आहे.” असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.