फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने उघडकीस आणला. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि अपारदर्शक कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत एफटीआयआय २०२४–२५ च्या प्रवेश प्रक्रियेत झालेल्या त्रुटींविरोधात तीव्र भूमिका घेत विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
एफटीआयआयने १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने लिपिकीय त्रुटी मान्य करत २४ ऑक्टोबर रोजी सुधारित यादी प्रसिद्ध केली. मात्र, सुधारित यादीत नव्या समस्या समोर आल्या आहेत. स्क्रीन अॅक्टिंग अभ्यासक्रमातील जागा १६ वरून २३ करण्यात आल्या असून यात आरक्षणाचे प्रमाण बिघडले आहे. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव जागा कमी झाल्या तर सामान्य आणि ओबीसी गटाच्या जागा वाढल्या, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे.
हेही वाचा : Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, एफटीआयआयने प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता न राखता स्टेज-१ आणि स्टेज-२ मधील गुण, श्रेणी व आरक्षण वर्गवारी जाहीर केली नाही. तसेच, ‘सीट प्रेफरन्स’ पर्याय नंतर देण्याऐवजी सुरुवातीला सक्तीने मागवण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागला आहे. या वादामुळे देशातील अग्रगण्य चित्रपट संस्थेच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
– तात्काळ प्रवेश प्रक्रिया स्थगित करणे.
– दोन्ही टप्प्यांचे निकाल व गुण जाहीर करणे.
– संपूर्ण प्रक्रियेवर बाह्य चौकशी समिती नेमावी.
– आरक्षण धोरणानुसार पारदर्शक आणि न्याय प्रवेश प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींना प्रशासकीय मंडळात स्थान द्यावे.
हेही वाचा : रणजी ट्राॅफीमध्ये पृथ्वी शाॅने नावावर केला नवा रेकाॅर्ड! अवघ्या 141 चेंडूत ठोकले द्विशतक
यंदाची दिवाळी पुणेकरांसाठी ‘ध्वनी प्रदूषणाची’ नवी घंटा वाजवून गेली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) प्राथमिक अहवालानुसार, यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील आवाजाची पातळी मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढली असून ती आरोग्यासाठी गंभीर धोक्याची ठरू शकते. सरकारी नियमानुसार, निवासी भागात दिवसाची ध्वनी मर्यादा ५५ डेसिबल आणि रात्रीची ४५ डेसिबल इतकी आहे. व्यावसायिक भागांसाठी दिवसाची ६५ आणि रात्रीची ५५ डेसिबल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, यंदा पुण्यातील दिवाळीदरम्यानची आवाजाची सरासरी पातळी या मर्यादेपेक्षा तब्बल १० ते २० डेसिबलने अधिक नोंदवली गेली.






