PM Kisan Scheme: रत्नागिरीतील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 'पीएम किसान'चा २२ वा हप्ता जमा
पुणे : पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असताना अॅग्रीस्टॅक (शेतकरी ओळख क्रमांक) योजनेत नाव नोंदणी न केलेल्या सुमारे ६१ हजार शेतकऱ्यांवर आता प्रशासनाची नजर असणार आहे. अशा लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून, निकषांत बसत नसल्यास पीएम किसानचा लाभ तात्काळ बंद करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये हालचाल सुरू झाली आहे.
अॅग्रीस्टॅक योजनेच्या प्रगतीचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल आणि कृषी विभागाला संयुक्तपणे ही मोहीम राबविण्याचे आदेश दिले. पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या परंतु अॅग्रीस्टॅकमध्ये नाव नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष शेतपातळीवर पडताळणी केली जाणार आहे. पात्र नसलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी हा शेतकरी ओळख क्रमांक अत्यावश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे हा क्रमांक नसल्यास भविष्यात कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही, अशीही सूचना देण्यात आली आहे.
काही शेतकरी अद्यापही नोंदणीपासून दूर
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी केली असली तरी काही शेतकरी अद्यापही नोंदणीपासून दूर आहेत. त्यामुळे पीएम किसानचा लाभ घेत असलेल्या अशा ६१ हजार शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती कुळकायद्याचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली.
हे सुद्धा वाचा : बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान अन् निकाल
शेतकऱ्यांमध्ये उडाली खळबळ
प्रशासनाच्या या निर्णयामुळे अॅग्रीस्टॅक नोंदणी टाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पात्र लाभार्थ्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात आले झटपट 2 हजार रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता जाहीर केला आहे. या हप्त्याच्या माध्यमातून देशभरातील 9.32 कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एकूण 18,640 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाली आहे. पीएम किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याची शेतकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर हा हप्ता जाहीर झाल्यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत देते.






