पुयातील औंधमध्ये बिबट्याचे दर्शन (फोटो- सोशल मीडिया)
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला
औंध परिसरातील बिबत्याला शोधण्यात यश
वनविभागाचे नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Leopard In Pune: पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर आणि शहर परिसरात बिबट्याने दर्शन दिले. पुणे विमानतळ परिसरात, सिंहगड रोड परिसरात बिबट्याने दर्शन झाल्याचे दिसून आले आहे. मात्र आता बिबट्याने थेट पुण्याच्या शहरी भागात दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याच्या औंध परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्या दिसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने औंध परिसरात शोध मोहीम राबवली. पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले आहे. मतर त्यानंतर अजूनही हा बिबट्या कुठे दिसून आलेला नाही. त्यामुळे वनविभाग त्याचा शोध घेत आहे.
त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, बिबट्या असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पोलिस प्रशासन आणि वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या पहाटेच्या सुमारास एका सोसायटीच्या परिसरात बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन
पुणे विमानतळाच्या धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के-४ परिसरात गुरुवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसरे दर्शन ठरले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी विमानांची सर्वाधिक वाहतूक असतानाच बिबट्या पार्किंग बे क्रमांक ८, ९ आणि १० पासून काहीच अंतरावर दिसला. सुदैवाने तो थेट धावपट्टीवर पोहोचला नाही. या आठवड्यात मंगळवार आणि गुरुवारी मध्यरात्री बिबट्या धावपट्टीजवळील टॅक्सी वे-४ परिसरात दोनदा दिसल्याची नोंद आहे.
पुणे तिथे काय उणे! मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन; मोठा धोका टळला
वन विभागाच्या सूचनांकडे विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्ष
यापूर्वीच्या घटनेनंतर वन विभागाने विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असलेल्या संरक्षणभिंतीची डागडुजी तातडीने करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्यापही भिंत दुरुस्तीअभावी तशीच असून, या भिंतीतूनच बिबट्या विमानतळ परिसरात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. के-४ परिसरातील भुयारी ड्रेनेज पाइपला जाळ्या बसवून मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. धावपट्टीखालील गटारांनाही जाळ्या लावून बंद करण्यात आले आहे. बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली असून, विमान प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.






