(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर अनेक मनोरंजक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे जंगलातील देखील अनेक दृश्ये शेअर केली जातात. जंगलात नेहमीच शिकार आणि भक्षकांचा खेळ सुरू असतो, ज्यामध्ये कधीकधी भक्षक शिकारवर मात करतात तर कधीकधी भक्षक शिकारींना मारतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे , ज्यामध्ये पृथ्वीवरील सर्वात धोकादायक शिकारी मानला जाणारी घोरपड आणि बकरी यांच्यात एक रोमांचक खेळ पाहायला मिळतो. घोरपडीला बकरीची शिकार करायची असते खरी पण बकरी घोरपडीला असं जंगल फिरवते की घोरपड थकते पण तिच्या हाती बकरी काही लागत नाही. शिकारीचे हे रोमांचक दृश्य आता सोशल मीडियावर युजर्सना हसू आणत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात घोरपड बकरीवर हल्ला चढवताना दिसून येते. बकरीला पाहताच ती धावत पळत तिच्या दिशेने जाते पण बकरी घाबरून तिथून पळून निघते. बकरीला पळताना पाहून घोरपडही तिच्या मागे वेगाने पळू लागते पण बकरीचा वेग इतका जबरदस्त असतो की शेवटपर्यंत ती काय घोरपडीच्या हाती लागत नाही. बकरी सारखा सामान्य प्राणी घोरपडीच्या हाती न लागणे जरा आश्चर्यकारक आहे. व्हिडिओमध्ये दोघांची ही पळा पळी पाहून जणू ते पकडा पकडी खेळत आहेत असेच वाटत आहे. शिकारीचा हा अनोखा आणि मजेदार व्हिडिओ आता युजर्सचे मात्र चांगलेच मनोरंजन करत आहे.
i didn’t know komodo dragons can run this fast. it honestly makes them even more terrifying to me🐐😱 pic.twitter.com/C2VInVqUgS — Nature & Animals🌴 (@naturelife_ok) October 4, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @naturelife_ok नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला त्या प्राण्यांचा तिरस्कार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला आश्चर्य वाटते की कॅमेरामनच्या मनात काय होते की तो यात हस्तक्षेप करत नव्हता, ही कोणाची बकरी आहे?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जर घोरपडीने बकरीला चावा घेतला तर बकरी एक-दोन दिवसांत मेली जाईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.