Real Estate News : सोन्याचं ऑफिस की हिऱ्याचं? पुण्यात महिन्याला ८.५ कोटी रुपये भाडं देणारा 'हा' व्यवहार चर्चेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे 1,258 कोटी रुपये असून, प्रति चौरस फूट 82 रुपये दराने कंपनीला दरमहा सुमारे 8.53 कोटी रुपये भाडे मोजावे लागणार आहे. 7 एप्रिल 2025 पासून हा करार लागू झाला असून, कंपनीने 51.20 कोटी रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केले आहेत.
करारानुसार ही रक्कम दरवर्षी 4.5 टक्क्यांनी वाढणार आहे. सहा पोडियम स्तर आणि 12 मजल्यांचा समावेश असलेली ही जागा अत्यंत प्रशस्त असून, मोठ्या प्रमाणावर कार्यालयीन विस्तारासाठी उपयुक्त आहे. पुण्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC), आयटी व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून वाढती मागणी लक्षात घेता खराडी परिसर प्रमुख ऑफिस कॉरिडॉर म्हणून उदयास आला आहे.
याच पार्श्वभूमीवर इतरही मोठे व्यवहार झाले आहेत. वी वर्कने वाकडमधील फिनिक्स मिलेनियम टॉवर-3 मध्ये सुमारे 2 लाख चौरस फूट जागा 161 कोटी रुपयांहून अधिक किमतीत भाड्याने घेतली आहे. तसेच वेल्सपुन इंटरप्राईजेस लिमिटेड ने हिंजवडीतील रेडियस आयटी पार्कमध्ये 4.5 लाख चौरस फूट जागा 82 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेवर घेतली आहे.
ग्लोबल सर्विस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड ने 1.93 लाख चौरस फूट जागा 10 वर्षांसाठी घेतली असून, मासिक भाडे 1.42 कोटी रुपये आहे. तर BMW ने ईएसआर पुणे इंडस्ट्रियल पार्कमध्ये लॉजिस्टिक्ससाठी अतिरिक्त जागा भाड्याने घेतली आहे. एकूणच, पुण्यातील व्यावसायिक कार्यालयीन जागांची मागणी झपाट्याने वाढत असून, शहर देशातील महत्त्वाच्या कॉर्पोरेट हबपैकी एक म्हणून अधिक बळकट होत आहे.
खराडीतील या प्रकरणाची चौकशी सुरु असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. प्रशासनाने कब्जेहक्काने तसेच भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींचा अटींनुसार वापर न केल्यामुळे १५ जमिनी जप्त केल्या आहेत.






