Photo Credit- Social Media (पुणे विधानसभा निवडणूक 2024)
पुणे : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या यशानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही हा आत्मविश्वास असाच राहिल, अशी कार्यकर्त्याची भावना आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती. त्यामुळे काँग्रेसमधून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर काल पुण्यातील काँग्रेसभवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीत पुण्यातील जवळपास आठ विधानसभा मतदारसंघासाठी 44 इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत यावेळी निवडणूक लढवणाऱ्यांमदध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
हेही वाचा: सांधेदुखीच्या प्रकरणांमध्ये 50 टक्के वाढ, कारण ठरतोय इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिरिक्त वापर
आगामी विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितरित्या सामोरे जाणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील जागांसाठी चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी कांग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षाने आणि काँग्रेसने राज्यातील सर्व जागांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे.
शरद पवार यांच्याकडे राज्यभरातून जवळपास 1700 जणांनी अर्ज पाठवून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात एकट्या पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून 42 जणांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज पाठवले आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी नुकतेच पुण्यातील इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या.
हेही वाचा: कपाळावर टिकली लावण्याचे आहेत अफलातून फायदे, फक्त फॅशन नाही तर ‘या’ गोष्टीसाठी लावाच
तर दुसरीकडे, पुणे शहरातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडूनही अर्ज मागवण्यात आले होते. यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी जवळपास 27 जणांनी अर्ज केले होते. पण जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसतशी ही संख्या 27 वरून 44 वर पोहचली हे. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी या मुलाखती घेतल्या. या अनेक इच्छुकांनी मोठे शक्तीप्रदर्शनही काँग्रेस भवनचा परिसर दणाणून टाकला होता.
एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्यांही मोठ्या प्रमाणात वाढताना असतानाच काँग्रेसच्या इच्छुकांच्या संख्येतही वाढ होई लागली आहे. पण इच्छुकांची वाढती संख्या शरद पवार आणि काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तसेच या इच्छुकांना शांत करण्याचे आवाहनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर असणार आहे.
हेही वाचा: घरात सुख-समृद्धी येण्यासाठी कोणती वास्तू आहे फायदेशीर?