सौजन्य - नवराष्ट्र टीम
देशमुख यांनी सांगितले की, संबंधित प्रकाराबाबत तक्रार करूनही प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मी आमचे मित्र अजय देशमुख जी ९ येथे जेवण करण्यासाठी गेलो असता, अजय देशमुख यांच्या जेवणात झुरळ आढळून आले. ही गोष्ट आम्ही मेस चालवणाऱ्या व्यक्ती यांच्या लक्षात आणून दिली. तर त्यांनी ते झुरळ नसून मुंगळा आहे असे वक्तव्य केले म्हणजे मुलांच्या जेवणात मुंगळ्याला परवानगी आहे का? – ऋषिकेश जगताप (विद्यार्थी)
मुलांच्या वसतिगृह क्रमांक ९ मधील मेसमध्ये विद्यार्थीच्या जेवणाच्या ताटात झुरळं निघाले आहे. अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडत आहेत. विद्यापीठ प्रशासन अशा मेस चालकांवर कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही. नोटीस अथवा दंड करत नाहीत. हे थांबले पाहिजे आणि विद्यार्थींना पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती अध्यक्ष राहुल ससाणे यांनी केली.
विद्यापीठातील मेसच्या समस्या वारंवार वाढत असून, अन्नपदार्थांमध्ये झुरळे, आळ्या आणि किट्क आढळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत. मात्र, या तक्रारींकडे विद्यापीठ प्रशासन आणि वसतिगृह प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. – अजय देशमुख (विद्यार्थी)






