शिक्रापूरमध्ये भीषण अपघात (फोटो- टीम नवराष्ट्र)
शिक्रापूर: ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथे चार दिवसां[पूर्वी पाण्याच्या टँकरखाली कार शिरुन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडलेली असताना त्याच ठिकाणी कंटेनरला धडकून दुचाकीवरील आकाश साहेबराव गेजगे हा ठार तर त्याचा साथीदार बंडू बाळासाहेब गोते हा जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रणजीत महेंदर यादव या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून आकाश गेजगे व बंडू गोते हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ डब्ल्यू एन ३७६९ या दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चाललेले असताना बजरंगवाडी येथे पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चाललेल्या एम एच ४६ सि एल ०१८७ या कंटेनर चालकाणे अचानकपणे पुन्हा पुणे दिशेने वळण घेतल्याचे कंटेनरच्या मागील बाजूस दुचाकीची गेजगे व गोते यांच्या दुचाकीची धडक बसून दुचाकी रस्त्यावर पडत कंटेनरखाली गेली.
दरम्यान दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी होऊन झालेल्या सदर अपघातात आकाश साहेबराव गेजगे वय ३३ वर्षे रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे मूळ रा. सुरळवाडी ता. गंगाखेड जि. परभणी यांचा मृत्यू होऊन बंडू बाळासाहेब गोते वय ५० वर्षे रा. येवलेवस्ती पेरणे ता. हवेली जि. पुणे हे जखमी झाले असून याबाबत राजाभाऊ सखाराम गेजगे वय २८ वर्षे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रणजीत महेंदर यादव वय २५ वर्षे रा. देवारा हरदपुरा ता. महाराजगड जि. आजमगड उत्तरप्रदेश या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर हे करत आहे.
बँक मॅनेजरकडून महिलेची 94 लाखांची फसवणूक
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असिस्टंट एरिया मॅनेजरने खातेदार महिलेचा चेक घेऊन पैसे बँकेच्या खात्यात वर्ग न भरता स्वतः सह पत्नी व मैत्रिणीच्या खात्यात वर्ग करुन महिलेला बनावट पावत्या दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेची तब्बल ९३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचा कोरेगाव भीमा शाखेतील असिस्टंट एरिया मॅनेजर विकास गुलाब बेलदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: Shikrapur Crime News: बँक मॅनेजरकडून महिलेची 94 लाखांची फसवणूक; चेक बँकेत न भरता…, प्रकरण वाचाच…
वढू बुद्रक ता. शिरुर येथील योगिता आरगडे या महिलेच्या कुटुंबीयांनी कोरेगाव भीमा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये महिलेचे बचत खाते काढून शेतीच्या उत्पन्नातून मिळणारे पैसे सदर खात्यावर जमा केलेले होते. २०२३ मध्ये महिलेने बँकेत जाऊन तत्कालीन बँक मॅनेजर नेहा नलावडे यांना भेटून आमच्या खात्यावरील पैसे बँकेतील चांगला परतावा मिळणाऱ्या स्कीममध्ये गुंतवायचे असल्याबाबत सांगितले.