वडगाव मावळ नगर पंचायत नगर परिषद निवडणूकीमध्ये अजित पवार गट आणि भाजपचा विजय झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)
प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता राहुल ढोरे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत अवघ्या १ मताने विजय मिळवला. तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजय भवार यांनी २ मतांनी विजय संपादन केला. दोन्ही प्रभागांतील निकालांनी निवडणुकीतील चुरस अधिक ठळकपणे समोर आली. या निकालामुळे वडगाव शहराच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून आगामी काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने पक्षाकडून ठोस निर्णय अपेक्षित आहेत. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.
हे देखील वाचा : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल
नगराध्यक्ष पदासह प्रभागनिहाय निकाल जाहीर
वडगाव नगरपंचायत निवडणुकीत चुरशीच्या लढतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे यांनी ७७९५ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार : मते | पराभूत उमेदवार : मते |
|---|---|---|
| प्रभाग १ | भोसले पुनम विकी : राष्ट्रवादी : ६७० | अश्विनी भोरू हिले : शिंदे गट शिवसेना : २०३ |
| प्रभाग २ | ढोरे दिनेश गोविंद : भाजप : ५६० | ढोरे प्रविण विठ्ठल : राष्ट्रवादी : 547 |
| प्रभाग ३ | धडवले रोहित मंगेश : भाजप : ४१५ | भाऊसाहेब तुकाराम ढोरे : राष्ट्रवादी : ३५९ |
| प्रभाग ४ | ढोरे सुनिता राहुल : राष्ट्रवादी : ३२३ | ढोरे पूजा अतिश : भाजप : ३२२ |
| प्रभाग ५ | ढोरे रुपाली अतुल : अपक्ष : ५०४ | ढोरे वैशाली पंढरीनाथ : राष्ट्रवादी : ३१३ |
| प्रभाग ६ | वहिले विशाल वसंतराव : भाजप : ४७३ | ढोरे मयूर प्रकाश : राष्ट्रवादी : ३९९ |
| प्रभाग ७ | भवार अजय महेंद्र : राष्ट्रवादी : ३९३ | वाघमारे चंद्रजीत दिनकर : अपक्ष : ३९४ |
| प्रभाग ८ | चव्हाण माया अमर : राष्ट्रवादी : ३९८ | म्हाळसकर वैशाली रमेश : भाजप : २५३ |
| प्रभाग ९ | चव्हाण सारिका प्रशांत : अपक्ष : ४४३ | चव्हाण सुप्रिया प्रविण : भाजप : ३५० |
| प्रभाग १० | वाघवले आकांक्षा योगेश : राष्ट्रवादी : ४१२ | भेगडे सुजाता गणेश :भाजप : २८९ |
| प्रभाग ११ | ढोरे सुनील गणेश : राष्ट्रवादी : ५५३ | म्हाळसकर किरण रघुनाथ : भाजप : २३९ |
| प्रभाग १२ | म्हाळसकर गणेश सोपान : राष्ट्रवादी : ३६३ | म्हाळसकर राजेंद्र हनुमंत : भाजप : २०३ |
| प्रभाग १३ | म्हाळसकर अजय बाळासाहेब : राष्ट्रवादी : ५३२ | भेगडे विनायक रामदास : भाजप : ४५४ |
| प्रभाग १४ | सोनवणे वैशाली गौतम :राष्ट्रवादी : ३०६ | मोरे दीपाली शरद: भाजप : १९१ |
| प्रभाग १५ | कुडे अनंता बाळासाहेब : भाजप : ६०९ | कुडे राजेंद्र विठ्ठलराव : राष्ट्रवादी : ३४८ |
| प्रभाग १६ | राणी संतोष म्हाळसकर : भाजप : ३८५ | ढोरे मिनाक्षी गणेश : राष्ट्रवादी : ३१६
म्हाळसकर सायली रूपेश : अपक्ष : १२७ |
| प्रभाग १७ | म्हाळसकर अर्चना संतोष : भाजप : ४३३ | ढोरे अर्चना ज्ञानेश्वर : राष्ट्रवादी : ३०३ |
हे देखील वाचा : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा
माजी नगराध्यक्षाचा पराभव
नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचा विजय आणि अनेक प्रभागांमध्ये मिळालेल्या यशामुळे वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. निकाल जाहीर होताच शहरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. वडगावचे पहिले नगराध्यक्ष मयूर ढोरे हे प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत होते. त्यांचा भाजपचे विशाल वहिले यांनी ७४ मतांनी पराभव केला. मयूर ढोरे यांना ३९९ तर विशाल वहिले यांना ४७३ मते मिळाली.






