महाराष्ट्रातून गुजरातला काय काय नेलं? मुंबईतील सभेत राहुल गांधींनी यादीचं वाचून दाखवली
महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काचे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळवले जात आहेत. इथल्या भूमीपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या जात आहेत. प्रकल्प गुजरातमध्ये गेले म्हणून विरोध नाही, तर प्रकल्प इथे सुरू होत असतानाही ते तिकडे का नेले जातात हा प्रश्न आहे? असं म्हणत राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेलेल्या प्रकल्पांची यादीच वाचून दाखवली. गौतम अदानी ग्रुला काय काय मिळालं हे ही सांगितलं.
अॅपल आयफोन कंपनी, विमान बनवणारी कंपनी बोईंग युनीट महाराष्ट्राच्या हातून हिरावून घेतले गेले आणि गुजरातल नेले. या प्रकल्पांमधून ५ लाख रोजगार निर्माण होणार होते. सेमी कन्डक्टर प्लान्ट, आयफोन मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट, गेल पेट्रो केमिकल प्रोजेक्ट, टाटा एअर बस प्रोजेक्ट, हे सर्व प्रकल्प जे महाराष्ट्राच्या जनतेच्या, तरुणांच्या हक्काचे होते ते गुजरातला नेण्यात आले.धारावीचा १ लाख कोटींचा प्रोजेक्ट अदाणी समूहाला देण्यात येत आहे. तो धारावीकरांच्या हक्काचा आहे. मात्र रोजगार अदाणी अंबानी देऊ शकत नाहीत. ते फक्त तुमचे रोजगार हिरावून नेऊ शकतात. रोजगार देणारे लहान मॅन्युफॅक्चरींग प्रकल्पांमधून निर्माण होत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.
महागाई इतकी वाढली आहे की अन्नधान्याचे भाव गगनाला भीडले आहेत. गॅस सिलिंडर महागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या खिशातून ९०००० रुपये टॅक्स सरकारकडे जात आहे. अदानी जितका टॅक्स देतात तितकाच टॅक्स सामान्य माणसाकडून वसूल केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा-Donald Trump Victory: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी हे आठ लोक ठरले ‘ट्रम्पकार्ड’
आजपर्यंत देशात सरकारी यंत्रणांचा जितका दुरुपयोग झाला तितका आजपर्यंत कधीही झाला नाही. ईडी असो की विद्यापीठं प्रत्येक सरकार संस्थेय भाजप आणि आरएसएसचे लोक भरलेले आहेत. कारण सरकारला या संस्थांमध्ये हस्तक्षेप करता यावा. मनमानी कारभार करता यावा. ईडी सारख्या संस्थाचा वापर लोकांना धमवण्यासाठी करता यावा, यासाठी या लोकांनी तिथे नेवून ठेवण्यात आलं आहे.
जातनिहाय जनगणना का महत्त्वाची?
दलित, आदिवासी आणि मागास समाजाला जातीचा रोज अनुभव येतो . त्यांना यातून रोज जावं लागतं. कामाच्या ठिकाणी असेल, शिक्षणात, नोकरीत, इतकंच नाही तर ते ज्या ठिकाणी राहतात, तिथेही त्यांना याची पदोपदी जाणीव होते. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली तर खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजाला न्याय मिळेल. तसंच जातीनुसार जनगणना केली तर देशाचं सर्व चित्र स्पष्ट होईल. प्रत्येक सामान्य मानसाला समजेल की कोणाच्या हातात किती पैसा आहे. सरकारी नोकरी, भाडवल, कोणाच्या हातात आहे. ज्यावेळी हे होईल त्यावेळी त्यात दलित, आदिवासी, मागास असे कुणीही देशाच्या पुंजीमध्ये आपल्याला दिसणार नाहीत. जातनिहाय जनगणना हा विकास करण्याचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ती झाली तर सर्व जाती धर्माला योग्य न्याय मिळेल, असंही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केलं.