कर्जत/संतोष पेरणे : हाय रिच सीड्स कंपनीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एमडीआर 2001 हे कीटकनाशक उपलब्ध करून देण्यात आले होते.या कीटकनाशक यांचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून शेतकऱ्यांच्या शेतातील भातपीक कोणत्याही प्रकारच्या रोगराई यांचा प्रादुर्भाव झालेला नाही.दरम्यान एमडीआर 2001 हे कीटकनाशक शेतकरी वर्गसाठी वरदान असल्याचा दावा हाय रिच सिडस कंपनीकडून करण्यात आलं आहे.कंपनीचे गजानन परळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हा दावा केला असून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भाताच्या पिकाची पाहणी कंपनीकडून करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील शिरसे गावांमधील प्रगतशील शेतकरी विनायक देशमुख यांच्या शेतावरती जाऊन संशोधित ध्यान एम डी आर 2001 या भात पिकाची पाहणी करण्यात आली. हाय रिच सीड्स कंपनीचे प्रतिनिधी गजानन परलकर, आर एस एम राहुल पवार,किसान क्रांती संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम शेळके, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास माळी ,खरेदी-विक्री संघटना काशिनाथ ठमके, खरेदी-विक्री संचालक विनायक गोगटे, तालुका सल्लागार पंढरीनाथ दाभाडे, साधुराम पाटील, जगन्नाथ पाटील, रायगड जिल्हा संघटन रमाकांत जाधव, उमेश देशमुख,दीपक देशमुख, अनंता घारे ,जनार्दन भोईर,पाठक,कुंटे,रतन कुंभार, आणि अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.वासरे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात असे पीक बहरले असून शेतकरी आनंदित असल्याचे पाहणी दौऱ्याच्या वेळी दिसून आले.
एमडीआर 2001 यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात हाय रिच सिडस कंपनीचे अधिकारी यांनी पाहणी केली. भाताचे बियाणे त्यांनी आपल्या शेतीमध्ये पिकवले आहे त्या शेतातील पिकाला कुठल्याही प्रकारे खोडकिडा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही व शेतीमध्ये पिक उत्तमरीत्या आलेले दिसून आले. या पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवस असून या रोपांचे फुटवे खूप जास्त प्रमाणात होत असतात आणि त्यानंतर ही रोपे खूप मजबूत येतात. त्या बियाणांपासून निर्माण होणारे भाताचे पीक हे अतिशय छान मध्यम बारीक दाणे असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच जास्त उत्पादन देणारे भाताचे वाण म्हणून ओळखले जाते. बीपी एच प्रतीरोधक वाण म्हणूनही ओळखले जाते. पानावर येणाऱ्या करपा रोगा करिता प्रतिरोधक भात वान आहे.यावेळी बीड गावातील 100हुन शेतकरी उपस्थित होते आणि त्यांना हाय रिच सीड्स कंपनीच्या वतीने भट कंपनीचे विले भेट देण्यात आले.