रोह्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू (फोटो - सोशल मीडिया)
इच्छुकांची नगरपालिकेसाठी शक्ती पणाला
शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीत खरा सामना
सौ. तटकरेंना निवडणुकाच्या रणांगणात उतरविण्याचे संकेत
रविंद्र कान्हेकर/रोहा: उत्कंठा लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आणि रायगड जिल्हासह महत्त्वाच्या रोहा नगरपालिकेचे निवडणूक वातावरण चांगलेच तापले. मुख्यतः महायुतीतीलच शिवसेना शिंदे गट विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादीतच संघर्षमय तितकाच आरोप प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळतो की काय ? या शंकेने सध्या रोह्यात वातावरण मात्र तापलेलं आहे.
शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरेंवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाहीत. खुद्द तटकरेंच्या होमग्राऊंडवर शिंदे गटाचे तीनही आमदार, पदाधिकारी जुजबी ताकदीची भाषा करीत आलेत. “रोहा बदलणार, लढणार आणि जिंकणार, रोह्यामधील प्रस्थापिकांना हद्दपार करून भगवा फडकविणार”, अशी भीष्म प्रतिज्ञा शिंदे गटाच्या आमदारांनी केली.
Maharashtra Politics: महायुती फुटणार? निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वबळाच्या तयारीत? बंडखोरीची शक्यता
सौ. तटकरेंना निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्याचे संकेत
शिल्पा धोत्रे ह्या प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जाते. अशोक धोत्रे यांचा जनसंपर्क, स्वाभिमान बाणा कामाला येईल, धोत्रे यांनी नगराध्यक्ष उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याने काय होते ? हे पहावे लागेल. दुसरीकडे माजी नगराध्यक्ष, विकासकामांची हातोटी असलेल्या समीर शेडगेंची कन्या वनश्री शेडगे यांना उमेदवारी मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आहेत. अशात अनुभवी, नवोदीत तरुण उमेदवारी स्पर्धेत कोण बाजी मारतो ? अशा तर्कवितकांत सौ तटकरे यांना रणांगणात उतरविण्याचे संकेत प्राप्त झाले. पण सौ. तटकरे नेमक्या कोण की नुसती चर्चा? नगराध्यक्ष महिला उमेदवारीची नक्की कोणाला लॉटरी लागते? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
शिल्पा धोत्रेच्या नावावर शिक्कामोर्तबचा दावा
दुसरीकडे नगरपालिका सतेच्या कायम चाव्या असलेला राष्ट्रवादीतून थेट ओबीसी महिला नगराध्यक्षा उमेदवारीची लॉटरी कोणाला लागते? याचीच धाकधूक सर्वांनाच आहे. पूजा पोटफोडे, शिल्पा धोत्रे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या कन्या वनश्री शेडगे यांची नावे क्रमशः चर्चेत असले तरी तटकरेच आडनावाच्या महिला नगराध्यक्ष उमेदवार देण्याचे संकेत मिळाल्याने नेमकी दावेदारी कोणाकडे? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणीत पुन्हा पोटफोडे यांचे नाव मागे पडल्यास अनुभवी शिल्या धोत्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचा जोरदार दावा समर्थकांनी केला. सौ. तटकरेंचेही नाव अचानक चर्चेत आले, त्यामुळे धोत्रे की शेडगे? यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.
शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीत खरा सामना
खा. सुनिल तटकरेंनी रोहा बदलतोय, रोहा बदललाय असे सूचक वक्तव्य करत विरोधकांचा हिशोब वेळ आल्यावर चुकता करू, असे अप्रत्यक्ष संकेत दिल्याने शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीतच खरा सामना पाहायला मिळणार आहे. याच आरोप प्रत्यारोप राजकारणात आता उमेदवारांसाठी रस्सीखेच सुरू झाली. राष्ट्रवादीतून अनेक जुन्या चेहऱ्यांसोबत नवीन चेहरा देण्याचा मानस समोर आला. यात उमेदवारी कोणाला मिळते? याच चर्चेत रोह्याच्या महिला नगराध्यक्ष कोण, कोणाला उमेदवारी ? अशा चर्चाना सध्या उधाण आले आहे.






