चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग ज्यांना कायदेपंडीत म्हणून गौैरव करतं त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी अद्यापही न्यायालयीन कामकाजासाठी इमारत नसणं ही खेदाची बाब आहे. याच कारणाने तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई , सर्वोच्च न्यायालय, देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2023 मध्ये 8 ऑक्टोबर रोजी मंडणगड येथे तालुकास्तरीय न्यायालय इमारत बांधण्यासाठी भूमिपूजन सोहळा पार पडला.
या सोहळ्यामध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीचा लोकार्पण सोहळा न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करणार असल्याबाबत जाहीर केलंं होतं. न्य़ायालयीन इमारतीचं काम वेळेत पूर्ण करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागासमोर मोठे आव्हान होते कारण मंडणगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील अतिदुर्ग व अती मागासलेला तालुका असल्यामुळे येथे काम करताना खूप अडचणी आल्या तसेच सरासरी 4000.00 मि.मी.पाऊस असताना सुद्धा काम करणे कसोटीचे होते. न्यायालयीन इमारतीचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 50383.00 चौरस फूट असून सदर काम पूर्ण करण्याकरिता दोन वर्षाची मुदत असताना सदर काम दहा महिन्यात पूर्ण करण्यात आल्यामुळे 12 ऑक्टोंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालय .सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन करून सदर इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा व त्यांच्याशी संबंधित भिंती चित्रे या न्यायालीयन इमारतीच्या परिसरात उभारण्यात आली आहे अशा प्रकारची तालुका सभेची न्यायालय इमारत सबंध भारत देशामध्ये पहिल्यांदाच उभारण्यात आलेली आहे.
सदर इमारतीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केल्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशंसा केली. त्याबद्दल चिपळूण खेड दापोली मंडणगड गुहागर येथील ठेकेदार संघटनेचे वतीनेच्या वतीने चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेव व रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळ अधिकारी मिलिंद कुलकर्णी,उप अभियंता प्रमोद कदम, जठार व सहकारी कर्मचारी यांच्या अहोरात्र मेहनत घेतल्याने काम पूर्णत्वास गेले याबाबद्ल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे.