महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती. पहाटे दाट धुके असल्याने चालकाच्या नजरेस बॅरिकेड दिसले नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बस दरीत कोसळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकानेही त्वरित मदतकार्य राबवले.
जखमी प्रवाशांना खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शमल अंजर्लेकर, काजल शिगवण, दिलीप मोहिते, अमरनाथ कांबळे, दिपाली नाचरे, प्रतीक व प्रिया गुरव, आळंदी नाचरे, सर्वेश गुहागरकर, मयुरी शिगवण यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींना अधिक उपचारांसाठी चिपळूणमधील खासगी रुग्णालये व डेरवण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेनंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महामार्ग पोलिसांनी तत्काळ पथके तैनात करून वाहतूक सुरळीत केली. धुके, सुरू असलेले काम आणि अस्पष्ट बॅरिकेडिंग यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग दिवसागणिक मृत्यूचा सापळा ठरत आहे. कधी वाहतूक कोंडी कधी खराब रस्ते आणि आता तर धुक्यामुळे भीषण अपघात झाला आहे, हा महामार्ग म्हणजे कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाचा दुव . कोकणात जाणाऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हा वाहतूक कोंडी आणि अपघात टळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी कित्येक वर्षे हा मुंबई गोवा महामार्ग चौपदीरकणाच्या प्रतीक्षेत आहे. काही ठिकाणी कामे अजूनही रखडलेली आहेत. देशात सर्वत्र मोठे मोठे महामार्ग वेळेत बांधून तयार होत आहेत. मात्र गेले 14 ते 15 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरुच आहे. मात्र आता तरी कोकणकरांना सुरक्षित प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त केली गेली आहे.
Ans: घनदाट धुके महामार्गावरील सुरू असलेले काम अस्पष्ट बॅरिकेडिंग एक लेन बंद असल्याने चालकाला मार्ग स्पष्ट न दिसणे
Ans: रस्त्यांची दुरवस्था सुरू असलेली चौपदरीकरणाची कामे काही भागात कामे रखडलेली अपूर्ण बॅरिकेडिंग किंवा स्पष्ट दिशा न दर्शवणारे चिन्ह जड वाहतूक आणि कोंडी
Ans: प्राथमिक उपचार कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात गंभीर जखमींना चिपळूणमधील खासगी रुग्णालये व डेरवण रुग्णालयात हलवण्यात आले.






