चिपळूण : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा चिपळूण राष्ट्रवादीतर्फे शनिवारी जाहीर निषेध करण्यात आला. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे भारत पदाधिकारी, कार्यकत्यांनी आपला संताप व्यक्त केला. या वेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारे गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद – पवार पक्ष आक्रमक झाला आहे. शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे प्रदेश – उपाध्यक्ष व माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या जयेश बंगल्याशेजारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पडळकरांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनातून निषेध केला. संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध बॅनरवरील पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला रोष व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य चिटणीस एम. बंदुकवाले, तालुकाध्यक्ष मुरादभाई अडरेकर, रतन पवार, शिरीष काटकर, अजमल पटेल, विलास चिपळूणकर, संजय तांबडे, दीपिका कोतवडेकर, डॉ. रहमत जबले, सौ. राधा शिंदे, सौ. जया मोरे, सौ. राधिका तटकरे, हसीना तटकरे, निशिगंधा बांदेकर, सुभाष जोशी, शरद खापरे, सुनिल गुरव, नंदकुमार सावंत, प्रवीण रेडीज, महेश कातकर, प्रकाश साळवी, निलेश चव्हाण, पांडुरंग कातकर, अक्षय केदारी, संतोष लाड, सिकंदर पालोजी, अन्वर झिंगू, राजेश केळस्कर, राकेश दाते, अविनाश हरदारे, रोहन चौधरी, श्रीनाथ खेडेकर, रईस अलवी, अकबर सुर्वे, गणपत काळे, अप्पा खेडेकर, इम्रान पालकर, ऋषिकेश ताम्हणकर, अफजल कच्छी, रोहन नलावडे, हिंदुराव पवार आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांच्य़ावर टीका करताना पडळकरांनी जीभ घसरली. पडळकर म्हणाले की, “अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे? एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, अशी अर्वाच्च भाषेत गोपीचंद पडळकर यांनी पाटलांवर टीका केली होती. माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा,” असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापले आहे. याचकारणामुळे चिपळण, सांगली आणि राज्यातील इतर भागातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.