मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्याबाबात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज बाजारातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी (NSE) ईडीने जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केले होते. पांडेंनी 2009 ते 2017 मध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते. या प्रकरणी आता पांडेंना आज दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
[read_also content=”नवराष्ट्र स्पेशल! सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात, राणेंनंतर आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे टार्गेट, नेमकं काय घडलंय? वाचा संपूर्ण घटनाक्रम https://www.navarashtra.com/maharashtra/sushant-dingh-rajput-death-case-after-eane-now-aaditya-thackeray-target-by-shinde-group-what-exactly-happened-355592.html”]
दरम्यान, संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे. संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर ईडीने त्या चौकशीची नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ईडीने संजय पांडे यांची चौकशी देखील केली होती. त्यानंतर त्यांना 2009 ते 2017 मध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते.