मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, अद्याप त्यांच्या राजीनामा (Resign) मंजूर झालेला नाही. त्यामुळं शिवसेनेनं याविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे, यावर उद्या सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा लटकणार असल्याचं बोललं जात आहे. राजीनामा न घेण्याचा पालिका आयुक्तावर दबाव असल्याचं बोललं जात असताना, आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
[read_also content=”ऋतूजा लटके व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त भेट? तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/maharashtra/rituja-latke-secret-meet-to-cm-eknath-shinde-335452.html”]
दरम्यान, आज माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकार परिषद घेता पालिका आयुक्त, पालिका व शिंदे गटावर काही गंभीर आरोप केलेत. पालिकेतील राजीनामा मंजूर का होत नाही, राजीमाना मंजूर न करण्यासाठी पालिका आयुक्त यांच्यावर कोणाचा तरी दबाव असल्याचं महाडेश्वर यांनी आरोप केला आहे. याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत की, नियमानुसार राजीनामा घेतला जाईल, राजीमाना घेण्यासाठी कोणावरही कोणाचा दबाव नाही. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.