पावसाळ्यात जलजन्य, साथरोगाचा धोका! आरोग्य यंत्रणा झाली सतर्क; नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष
पावसाळ्याच्या आगमनाबरोबर जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने जिल्ह्यात व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नदीकाठच्या अतिजोखीम गावांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून औषधसाठा, प्रशिक्षित मनुष्यबळ, साथरोग नियंत्रण पथके आणि जनजागृती मोहिमेद्वारे संभाव्य आरोग्य संकटाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढते. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या किटकजन्य आजारांसह अतिसार, गॅस्ट्रो, टायफॉइड यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. यासाठी आरोग्य विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार ग्रामसभा, रॅली, शाळांमधील जनजागृती कार्यक्रम, प्रदर्शन, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रॅपिड फिव्हर सव्र्व्हे, बाजारपेठ आणि रेल्वे स्थानकांवर जनसंपर्क अभियान यांचे आयोजन करण्यात आले आहे. डासांच्या प्रजननस्थळांवर गप्पी मासे सोडून नियंत्रणालाही प्राधान्य देण्यात आले आहे.पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली असली, तरी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.
अतिजोखीम गावांची पाहणी आरोग्य अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या अतिजोखीम गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामपंचायतींना संभाव्य आपत्तीच्या काळात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच साथरोग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. साथरोग नियंत्रणासाठी स्वतंत्र ‘साथरोग किट’ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये पॅरासिटामॉल, डॉक्सीसायक्लिन, क्लोरोक्वीन, प्रायमाक्वीन, ओआरएस पावडर, आयव्ही सेट, रिंगर लॅक्टेट, विविध प्रतिजैविक औषधे आणि आवश्यक निदान साहित्याचा नियंत्रणासाठी स्वतंत्र ‘साथरोग किट’ देखील तयार करण्यात आले आहे.
पाणी नमुन्यांची तपासणी: पुरस्थिती किंवा दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी जोखमीच्या गावांतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. जैविक आणि रासायनिक तपासणीच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. दूषित स्रोतांवर उपाययोजना केल्या जात आहेत.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्राथमिक आरोग्य कें द्रव उपकें द्रत विशेष नियंत्र णकक्ष कार्याबित करण् यात येणार असून त्यामध्ये आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका आणि वाहन चालक यांचा समावेश राहणार आहे. तसेच सर्व केंद्रांनी आवश्यक मनुष्यबळ, वाहने आणि औषधसाठा उपलब्ध ठेवावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
साथरोग प्रतिबंधक औषधांच्या किमान तीन किट्स तयार ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले असून त्यापैकी एक किट वैद्यकीय अधिकारी, दुसरी आरोग्य सहाय्यक आणि तिसरी केंद्रस्तरावर राखीव ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यातील संभाव्य साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा तालुकास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
Yavatmal News: शेतकऱ्यांनो, तांत्रिक बाबी वापरा! कृषी विभागाने केले आवाहन; यंदा कमी पावसाच्या अंदाज
साथरोगाचा उद्रेक झाल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि आशा स्वयंसेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. आवश्यक औषधे आणि साहित्याचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून गावपातळीवरील देखरेख व्यवस्थाही मजबूत करण्यात आली आहे.






