मुंबई : ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, अद्याप त्यांच्या राजीनामा (Resign) मंजूर झालेला नाही. त्यामुळं शिवसेनेनं याविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे, यावर उद्या सुनावणी पार पडणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. दरम्यान, ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा लटकणार असल्याचं बोललं जात आहे. असं जर झाले तर ठाकरे गटाकडे प्लॅन बी (plan B) तयार असून, ठाकरे गटातून दोन नाव (two name) समोर येत आहेत.
[read_also content=”महाविकास आघाडी सरकार कपटाने पाडण्यात आले – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/mahavikas-aghadi-government-was-overthrown-by-fraud-jayant-patil-335525.html”]
दरम्यान, राजीनामा मंजूर होण्यासाठी किमान ३० दिवस लागतात, असं पालिका आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे. त्यामुळं जर त्यांचा राजीनामा मंजुर न झाल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का असेल. असं झाल्या प्लॅन बी तयार ठेवावा लागतो, असं सूचक वक्तव्य महाडेश्वर यांनी केलं आहे. तसेच अर्ज रद्द झाल्यास बॅकअप प्लॅन तयार आहे असं अनिल परब म्हटलं आहे. त्यामुळं लटके ऐवजी दोन नाव शिवसेनेतून समोर आली आहेत. एक प्रमोद सावंत (Pramod sawant) यांना उमेदवारी मिळू शकते, अशा चर्चां आहे. प्रमोद सावंत हे अनिल परब यांच्या जवळचे मानले जातात. आणि दुसरे म्हणजे मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath mahadeshwar) यांचं नावही चर्चेत आहे. त्यामुळं जर लटके उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास शिवसेनेनं प्लॅन बी तयार ठेवत, दोन नाव देखील तयार ठेवली आहेत.