मुंबई : अंधेरी येथील निवडणुकीमुळं शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, अद्याप त्यांच्या राजीनामा (Resign) मंजूर न झाल्यामुळं शिवसेनेनं न्यायालयाचे (court) दार ठोठावले आहे. आज यावर सुनावणी पार पडली, त्यानंतर अखेर लटकेंना न्यायालयाने दिलासा देत, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, असं न्यायालयाचे पालिकेला आदेश दिले आहेत. त्यामुळं लटकेंचा निवडणुक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
[read_also content=”माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपात काहीही तथ्य नाही – ऋतुजा लटके https://www.navarashtra.com/maharashtra/thereis-no-truth-in-the-corruption-allegations-against-me-rutuja-latke-335836.html”]
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर टिका केली. सर्व गोष्टीसाठी न्यायालयाची पायरी चढावी लागते. तसेच या निवडणुकीत मविआतील सर्व नेते आम्हाला पाठिंबा देतील. राज्यातील राजकारणाची पातळी घसरत चालली आहे, कुरघोडी व सूडाचे राजकारण केले जात आहे, अशी टिका विरोधकांवर लटकेंनी केली. तसेच या निवडणुकीत आम्ही आमची ताकद पूर्ण पणाला लावू, व विक्रमी मतांनी जिंकून येऊ, असा विश्वास सुद्धा ऋतुजा लटके यांनी व्यक्त केला.