सासवड न्यायालयाच्या इमारतीसाठी बार असोशिएशनचे अजित पवारांना साकडे
सासवड: पुरंदर तालुक्याचे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय असलेली सासवड येथील इमारत खूप जीर्ण झाली असून बदलत्या परिस्थितीत काम करण्यास अपुरी पडत आहे. बार मधील वकील संख्या वाढली असून काम करताना खूप अडचणी जाणवत आहेत. यापूर्वी दिवाणी आणि फौजदारी असे दोनच न्यायाधीश होते. परंतु अनेक दिवसापासून तीन न्यायाधीश न्यायदानाचे काम करीत असून त्यानाही प्रशस्त जागा असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व सुविधा असलेली सुसज्ज इमारतीचे बांधकाम करून द्यावे. अशा प्रकारचे साकडे सासवड बार असोशिएशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घालण्यात आले आहे.
सासवड बार चे अध्यक्ष ऍड. अविनाश भारंबे यांच्यासह जेष्ठ विधिज्ञ ऍड. एल एन गायकवाड, ऍड. सचिन कुदळे, ऍड. सुनील कटके, ऍड. दिलीपराव निरगुडे, ऍड. मनोहर पवार आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. दरम्यान पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा ही काही दिवसापूर्वीच बारच्या वतीने सत्कार करून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच शिवतारे यांनीही जागेची उपलब्धता आणि इमारतीसाठी निधी देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे ऍड. अविनाश भारंबे यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सासवड न्यायालयाची इमारत आणि सद्यस्थिती याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पूर्वी पेक्षा खटल्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वी ठराविक रकमेचे खटले इथे चालत होते. परंतु आता मोठ्या रकमेचे खटले इथेच चालत असल्याने सध्याची इमारत अपुरी पडत आहे. त्याचबरोबर बारच्या सदस्यांसाठी स्वतंत्र कक्ष, मिटिंग हॉल, न्यायाधीशां साठी स्वतंत्र कक्ष, महिला वकिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आवश्यक आहे. सध्या वकिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने त्यांना कामकाज करताना खूप अडचणी जाणवत आहेत. यासाठी भव्य आणि सुसज्ज इमारतीची आवश्यकता असून या बाबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या काही दिवसांत कामकाजाला वेग येईल असे ऍड. अविनाश भारंबे यांनी सांगितले आहे.
कोल्हापुरात खंडपीठ करण्याच्या मागणीसाठी वकीलांची महारॅली
खंडपीठ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.! .कोल्हापुरात खंडपीठ झालंच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने शहरात महारॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन या मागणीचे निवेदन दिले. सदरचे हे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारले. सकाळी निघालेल्या या रॅलीत संपूर्ण जिल्ह्यातील वकिलास सहा विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी या रॅलीत सहभागी झाली होते. सदरचे निवेदन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवावे असे आव्हानेही वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांना निवेदन देऊन महारॅलीची सुरुवात झाली. पितळी गणपती धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी रोड ,स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर ,बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली दसरा चौकात आली. दसरा चौकात उपोषणास बसलेल्या माणिक पाटील – चुयेकर यांची भेट घेऊन ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच झाली. पदाधिकाऱ्यांच्या सह शिष्ट मंडळ आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तीन वेगवेगळ्या प्रतीचे निवेदन दिले. तसेच सर्व निवेदन मुख्यमंत्र्यांनी पाठवून द्या. त्यांचा पाठपुरावा करा अशी त्यांना विनंती केली.