फोटो सौजन्य- सोशल मिडिया
आज पुणे शहरात पावसाने हाहाकार घडविला. मुसळधार पावसामुळे पुण्यातील घरांमध्ये पाणि गेले लोकांचे अतोनात हाल झाले.आजच्या पावसाने पुण्यातील जनजीवनच विस्कळीत केले. तब्बल 4000 पुण्यातील लोकांचे स्थलांतर केले गेले आहे.आजच्या पावसाच्या कहरामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. उद्या पावसाची शक्यता लक्षात घेता आता प्रशासनाकडून उद्याही ( 26 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळांना ही सुट्टी जाहीर केली आहे. मात्र मुख्याध्यापक व शिक्षकांना सुट्टी नसणार आहे त्यांना शाळेत हजर राहावे लागणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी सुट्टीबाबत आदेश जारी केले आहेत.
रेड अलर्ट
पुण्यात उद्या 26 जुलैलाही हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी केला असल्याने प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. आजच्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सर्व ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यातील खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.
महाराष्ट्रात अनेक जिल्हात्यातील शाळांना उद्या सुट्टी
पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही अतिवृष्टी होत आहे. प्रशासनाकडून कोल्हापूरात ही अतिवृष्टीमुळे 26 आणि 27 जुलैला शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाणे आणि रायगड येथे ही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याने तेथे ही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सांगलीतील मिरज, पलूस, वाळवा ,शिराळा भागातील शाळांना सुट्टी दिली गेली आहे.