कोल्हापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोडबळावर लढण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु याबाबत त्यांची टोकाची भूमिका नव्हती, असे खासदार शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकाराशी बाेलताना स्पष्ट केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपचा पाठिंबा काढणार नाहीत, असे सुताेवाच खासदार पवार यांनी केले.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ही शिवसेनेच्या अथवा राष्ट्रवादीचे नेते ही संपर्कात असे सांगत आहेत. याबाबत विचारले असता खासदार पवार म्हणाले, मी पण वाट बघतोय कोण कोण जाणार आहे ते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपचा पाठिंबा काढून घेतील, असे वाटत नाही.
मुख्यमंत्री असताना मी सुद्धा दावोसला गेलो होतो अनेक कंपन्यांशी करार केले होते. पण आता करार झालेल्या कंपन्या महाराष्ट्रात आधीपासूनच आहेत. याचाच अर्थ गुंतवणूक करण्याचे आधी ठरवले ; मग त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित करण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना महाराष्ट्रात आणले, असा दिखावा करण्यात आला. गुंतवणुकीचे वातावरण तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही खासदार पवार यांनी सांगितले.
पुण्यात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आपली बंद खोली चर्चा झाली. या चर्चेत साखर कारखान्याच्या प्रश्नावर बरेच बोलणे झाले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्यात याबाबत बोलणे झाले. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे खासदार पवार यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही गटाच्या बीकेसीत तर उद्धव गटाच्या अंधेरीत मेळावा झाला. यावर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला तुलनेत अधिक गर्दी होती, असे खासदार पवार म्हणाले. तसे दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतली असे सांगत पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे मत बाेलूनन दाखविले, असे खासदार पवार यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्याचा विचार करत असतील तर त्याविषयी महाविकास आघाडीत सामंजस्यांनी विचार करण्यात येईल, असेही खासदार म्हणाले.
दाैरा गुंतवणुकीसाठी की पक्ष फाेडण्यासाठी
उद्योग मंत्री उद्याेगमंत्री सावंत दोन दिवसापूर्वी दावोसला दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, खासदार, माजी आमदार आणि काँग्रेसचे आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असे सांगितले होते. यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यावरून उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी, असा सवाल करत खासदार पवार यांनी निशाणा साधला.
अमित शहांची भूमिका अतिटाेकाची
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत सुद्धा शरद पवार यांनी भाष्य केले. अमित शहा जे काही बोलतात. याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाने सतत घेतली आहे. त्यांच्या बोलण्याचा एकंदरीत टोन हा अति टोकचा आहे. हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत. कोल्हापूरला शिकले की आणखी कुठे शिकले हे मला माहित नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
बंद खोलीत प्रकल्पाबाबत चर्चा
पुणे येथे बंद खोलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याशी चर्चा केली. ती राष्ट्रवादी पक्षाबाबत नव्हे, तर एका प्रकल्पाबाबत केली असे स्पष्टीकरण खासदार पवार यांनी दिले. नवीन सहकार मंत्र्यांना आपल्याशी दोन-तीन विषयावर बोलायचे होते. त्यामुळेच त्या कार्यक्रमात खुर्चीची अदलाबदल केली, असे त्यांनी सांगितले.