मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. आज पुन्हा एकदा सीमावादावरुन कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले असून कर्नाटकच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून, संतप्त प्रतिक्रिया येताहेत. या सर्व पार्श्वभूमीवरून राज्यातील वातावरण तापले असून, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे.
[read_also content=”राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत आहेतः बाळासाहेब थोरात https://www.navarashtra.com/maharashtra/rahul-gandhi-is-following-dr-babasaheb-ambedkar-thought-balasaheb-thorat-351546.html”]
दरम्यान, या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आहे. बेळगाव हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी केली आहे, असं फडणवीस म्हणाले. हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन बोम्मईनं दिलं आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शाहांना याची माहिती देणार आहे. तसेच शरद पवारांना बेळगावात जाण्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्रात कुणीही कायदा हातात घेऊ नये. सुनावणी सुरु असताना चिथावणीखोर वक्तव्य नको, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मविआ राजकारण करतंय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरुन मविआ राजकारण करत आहे, कुणाच्या वक्तव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व कमी होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे देशासाठी आदर्श आहेत. मविआची राज्यपालांवर वेगळीच नाराजी आहे. राज्यपालांविषयी मविआची पुराणी दुष्मनी आहे. असं फडणवीस म्हणाले. जे छत्रपतींच्या वंशजांकडून पुरावे मागतात, त्यांना यावर बोलण्याचा अधिकार आहे का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. मविआ राज्यपालांना टार्गेट करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.