फोटो - सोशल मीडिया
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (MVA) कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde government) येऊन १०० दिवस झाले. या १०० दिवसात ईडी सरकारने (ED Government) केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना (Ganpati) भेटी, नवरात्रोत्सवात (Navratra festival) देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख थेट रोजगार निर्मितीचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या (Gujrat) घशात घातला, इतर गुंतवणूकही घालवली. गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ईडी सरकारने १०० दिवसात केल्याचा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
[read_also content=”दसरा मेळाव्यात फक्त तमाशा व शिव्या होत्या, राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल https://www.navarashtra.com/maharashtra/narayan-rane-attack-on-udhav-thackeray-in-press-conference-333544.html”]
दरम्यान, ईडी सरकारचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण अद्याप पंचनामे पार पडलेले नाहीत, थातूरमातूर पंचनामे केले जात आहेत, शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली तीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मविआ सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर ५० टक्के कमी करावेत अशी मागणी करणारे, आता मूग मिळून गप्प बसले आहेत. सीएनजी पीएनजीवरचे कर मविआ सरकारने कमी केले पण ईडी सरकारने कोणतेही कर कमी केले नाहीत उलट सीएनजी ८४ रुपये किलोपर्यंत वाढवण्याचे काम केले. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही तर गुजरातच्या हितासाठी, दिल्लीच्या आदेशानुसार काम करत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अशी टिका नाना पटोलेंनी राज्य सरकारवर केली.