सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले
मुंबई : राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील सरकार बदलण्याची दाट शक्यता दिसत आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. एकनाथ शिंदे तसेच त्यांचा बंडाळी गट उद्या मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मंगळवारी रात्री, राज्यपाल भगत सिंह कोशारी (Bhagat singh koshayri) यांना पत्र लिहिले होते. महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच (Superme Court) याचिका दाखल केली असून, त्यावर आज सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी (hearing) पार पडणार आहे. त्यामुळं मविआ आणि भाजपातील नेत्यामध्ये ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.
[read_also content=”ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान https://www.navarashtra.com/maharashtra/voting-for-271-gram-panchayat-general-elections-on-4-august-298590.html”]
दरम्यान, कालच्या भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत पत्र दिल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. या आरोपांना आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. नाना पटोलेंच्या सुपीक डोक्यातून आलेली नापीक कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनेला जनता भीक घालत नाही अशी जोरदार बोचरी टिका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध कऱण्याची मागणी केली होती. याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्य न्यायालयाच याचिका दाखल केली असून, त्यावर आज सांयकाळी 5.30 वाजता सुनावणी पार पडणार आहे.