मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची म्हणजे ठाकरे गटाची (Thackeray Group) महाप्रबोधन यात्रा सध्या सुरु आहे. मुलुंडमध्ये झालेल्या या सभेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटाला गद्दार म्हणत जोरदार टिकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात ‘त्या’ प्रवृत्तींना म्हणजे शिंदे गटातील गद्दार लोकांना गाडून महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवू, असा निर्धार शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
सध्या ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रभर सुरु आहे. या यात्रेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांचं भाषण लक्षवेधी ठरत आहे. तसेच त्यांना ऐकण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी होत आहे. दसरा मेळाव्यातील शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचं भाषण तुफान गाजलं होतं. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना, जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भाजप व शिंदे गटावर गद्दार प्रवृतीच्या लोकांना गाडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सन्मानाने मुख्यमंत्री होतील असं अंधारे म्हणाल्या. तसेच पंतप्रधानापासून सर्वंच आपलीच मन की बात करत आहेत, मात्र शेतकरी, मजूर, सामान्याचे प्रश्न, समस्या कोणी ऐकत नाही असं म्हणत त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर टिका केली.