पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची सुरक्षा यंत्रणा आता अॅक्शनमोडवर काम करत आहे. याचपार्श्वभूमीवर आता देशातील देशातील पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडून निघून जाण्याच्या सुचमना केंद्र सरकारकडून आल्या. यादरम्यान देशात वास्वव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी धक्कादायक आकडेवारी समोर आली असून या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी नागरिकांनी देश सोडावा या स्थानिक सुरक्षा यंत्रणेकडून शोध मोहिम राबविण्यात येत आहे.
याचपार्श्वभूमीवर आता कल्याण पोलिसांकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरीकांची शोध मोहिम सुरु केली आहे. कल्याणची पोलीसयंत्रणेकडून शहरातील परदेशी नागरिकांनी तपसणी सुरु आहे. कल्याणच्या डीसीपी स्कॉर्ड आणि पोलिस ठाण्यातील पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं आता समोर आलं असून सहा बांग्लादेशी नागरीकांना अटक केली आहे. हे बांग्लादेशी नागरीक प्लंबर आणि वायरमनचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ भारतीय नागरीकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशात दहशतवादाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचा मागणी देशातील नागरीकांकडून केली जात आहे. देशात पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरीकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांचा स्कॉर्ड आणि कल्याण डोंबिवलीतील विविध पोलिस ठाण्यातील पोलिसांनी संयुक्त कारवाई रविवारी रात्री सुरु केली होती.
या कारवाई दरम्यान डोंबिवलीतील ग्रोग्रास वाडीतून तीन बांगलादेशी नागरीक मिळून आले तर कल्याणच्या महात्मा फुले, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतीन प्रत्येकी एक असे तीन बांगलादेशी आढळून आले आहे. एकूण सहा बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. कबीर काझी, रफीक काझी, रब्बी हुसेन, खैरुल अली मंडल, शहा आलम शेख आणि अन्य एक जण अशी या बांगलादेशींची नावे आहेत. हे बांगलादेशी कल्याण डाेंबिवलीत परिसरात वायरमन आणि प्लंबरचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे.